Milk Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक झटका! दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ

याआधी नोव्हेंबरमध्ये मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात लिटरमागे 1 रुपये आणि टोकन मिल्कच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
Milk Price Hike
Milk Price HikeSaam Tv

Milk Price Hike: महागाईने आधीच त्रस्त सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसणार आहे. कारण मदर डेअरीची दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ होणार आहे. उद्यापासून नवे दर लागू होणार आहेत.

दिल्ली-NCR मधील ग्राहकांना झटका बसणार आहे. मदर डेअरीने फुल क्रीम, टोन्ड आणि डबल टोन्ड दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली आहे. हे दर मंगळवारपासून लागू होतील. (Milk Price)

Milk Price Hike
Lucknow: धक्कादायक! आईने मोबाईल काढून घेतला; ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

त्याचबरोबर गाईचे दूध आणि टोकन दुधाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी नोव्हेंबरमध्ये मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात लिटरमागे 1 रुपये आणि टोकन मिल्कच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. (Latest News)

मदर डेअरीने 2022 मध्ये दुधाच्या दरात पाच वेळा वाढ केली आहे. ताज्या दरवाढीपूर्वी मार्च, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात किमती वाढवण्यात आल्या होत्या. दुधासारखी जीवनावश्यक गोष्ट आता गरिबांच्या आवाक्याबाहेर होत चालली आहे, असे वारंवार वाढणाऱ्या दरांवर सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.

Milk Price Hike
WhatsApp New Features : व्हॉट्सअॅपचे पैसे वसूल फीचर! अश्लील व्हिडिओ आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्यांची आता खैर नाही

दिल्ली एनसीआरमध्ये नवे दर काय असतील?

मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करून 66 रुपये प्रतिलिटर केली आहे. तर टोन्ड दुधाची किंमत 51 रुपये प्रति लिटरवरून 53 रुपये केली आहे. त्याचबरोबर डबल टोन्ड दुधाची किंमत 45 रुपये प्रतिलिटरवरून 47 रुपये करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com