Longest Tunnel : देशातील सर्वात मोठी बोगदा मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर! ८ लेन, ५ किमी लांब; खासियत काय?

Longest Tunnel In India: देशातील सर्वात मोठा बोगदा हा मुंबई- दिल्ली एक्सप्रेसवेवर बांधण्यात येत आहे. या बोगद्यात ८ लेन असणार आहेत.
Longest Tunnel
Longest TunnelSaam Tv
Published On

राजस्थानमधील मुकुंद्रा हिल्सच्या व्याघ्र प्रकल्पातून दिल्ली ते एक्सप्रेस वे जात आहे. या एक्सप्रेस वेवर भारतातील सर्वात लांब बोगद्याचे काम सुरु आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात सुरु आहे. हा देशातील सर्वात मोठी प्रकल्प आहे.

यामध्ये आठ लेन असणार आहे त्या दोन समांतर नळ्यांमध्ये विभागलेल्या आहेत. यात प्रत्येक नळीमध्ये चार लेन आहेत. त्यामुळे या बोगद्यातून आता खूप वाहने एकाचवेळी प्रवास करु शकणार आहे. हा बोगदा ४.९ किलोमीटर लांब आहे. त्यात ३.३ किलोमीटर भूमिगत आहे. म्हणजे बोगद्यातील काही भाग हा जमिनीखालून जाणार आहे. तर उरलेला भाग कट अँड कव्हर पद्धतीने बांधण्यात आला आहे.

Longest Tunnel
Mumbai Metro 3: आरे ते वरळी प्रवास होणार सुसाट! मेट्रो ३चा दुसरा टप्पा मार्च महिन्यात खुला होणार, तिकीट आणि स्थानके किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ट्यूब २ भागासाठी काही खोदकाम शिल्लक आहे. हे काम पुढच्या महिन्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर उत्खनन कार्य जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रस्त्याचे बांधकाम सुरु होईल.या बोगद्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हा बोगदा मॉडर्न तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. येथे सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. येथे अनेक मॉडर्न लाइट्स आणि सेन्सर्स बसवले आहे. हे वाहतुकीचे नियंत्रणासाठी लावण्यात आले आहे.तसेच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे हवा शुद्ध केली जाते. तसेच एआय देखरेख यंत्रणा बसवली जाणार आहे. यामुळे वाहतूकीवर लक्ष ठेवणे तसेच डेटा कलेक्ट करणे सोपे होणार आहे.

Longest Tunnel
Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रंगपंचमीला पुणे मेट्रो राहणार बंद

या बोगद्याचा काही भाग अरुंद आहे. मार्च महिन्यापर्यंत याची रुंदी ९ मीटरवरुन १९ मीटर केली जाईल. तर उंची मीटरवरुन ११ मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. मुंबई ते दिल्लीला जोडण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा असणार आहे. हा एक्सप्रेस वे १,३५० किमीचा आहे. यात राजस्थामध्ये काही भाग येणार आहे.सध्या या एक्सप्रेसवेचे काम सुरु आहे. हा एक्सप्रेस वे लवकरच सुरु केला जाईल.

Longest Tunnel
Vande Bharat Express: मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार, कोण कोणती स्थानकं असणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com