Indian Navy: भारतीय नौदलाची मोठी कारवाई! 3300 किलोचे अंमली पदार्थ केले जप्त

Narcotics Control Bureau: भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो ग्रॅम प्रतिबंधित अमली पदार्थ वाहून नेणारी एक संशयित नौका ताब्यात घेतली आहे.
Indian Navy – Narcotics Control Bureau Anti Narcotics Operations at Sea, 3300 kg of narcotics seized
Indian Navy – Narcotics Control Bureau Anti Narcotics Operations at Sea, 3300 kg of narcotics seizedSaam Tv
Published On

Indian Navy:

भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो ग्रॅम प्रतिबंधित (3089 किलोग्रॅम चरस, 158 किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि 25 किलो ग्रॅम मॉर्फिन) अमली पदार्थ वाहून नेणारी एक संशयित नौका ताब्यात घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indian Navy – Narcotics Control Bureau Anti Narcotics Operations at Sea, 3300 kg of narcotics seized
Sushma andhare: जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल करायचे तर, नितेश राणेंच्या भाषणावर गुन्हा दाखल का नाही झाला? अंधारेंचा सवाल

याबाबत भारतीय नौदलाच्या सागरी टेहळणी विमानांकडून गुप्त माहिती मिळाली होती. तसेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने या गुप्त माहितीची शहानिशा केली होती. या माहितीच्या आधारावर, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अमली पदार्थांसह भारतीय जल सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयास्पद नौकेला अडवण्यासाठी भारतीय नौदलाने आखलेल्या मोहिमेत एका युद्धनौकेद्वारे कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

या नौकेला रोखून अलिकडच्या काळात अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर, ताब्यात घेण्यात आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जवळच्या भारतीय बंदरात खेचून नेले आणि त्यावरील कर्मचारी तसेच प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा कायदे अंमलबजावणी संस्थेच्या हवाली केला.

Indian Navy – Narcotics Control Bureau Anti Narcotics Operations at Sea, 3300 kg of narcotics seized
Lok Sabha Survey: भाजप 370 चा आकडा गाठणार? काँग्रेसला किती मिळू शकते जागा; नवीन सर्वेक्षणात समोर आली माहिती

ही कारवाई केवळ जप्त केलेल्या अवैध मालाचे प्रमाण आणि मूल्य या दृष्टीनेच महत्वपूर्ण आहेच शिवाय मकरान किनाऱ्यावरून निघणाऱ्या आणि विविध दिशांना तसेच हिंद महासागर क्षेत्रातील देशांना जाणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचे मार्ग ध्वस्त करण्यासाठी भारतीय नौदल आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्रयत्नांना अधोरेखित करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com