भारतीय उद्योजकाचं अमेरिकेत कांड; पत्नी अन् लेकाला संपवलं, नंतर स्वत: आयुष्याची दोर कापली

Indian Businessman Commits Suicide in America : वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या हर्षवर्धन एस. सिक्केरी (वय ५७) यांनी त्यांची पत्नी श्वेता पन्याम (वय ४४) आणि १४ वर्षांच्या मुलाची हत्या केली.
Indian businessman kills wife and son in US then end his life
Indian businessman kills wife and son in US then end his lifeSaam Tv News
Published On

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय उद्योजकाने पत्नी आणि मुलाची हत्या करुन स्वत:व गोळी झाडून आत्महत्या केली. वॉशिंग्टनच्या न्यू कॅसलमध्ये २४ एप्रिलला घडलेली ही दुर्दैवी घटना आज समोर आली आहे. दाम्पत्याचा दुसरा मुलगा यातून वाचला आहे. घटना घडली तेव्हा तो घरी नव्हता, त्यामुळे त्याचा जीव वाचला.

वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या हर्षवर्धन एस. सिक्केरी (वय ५७) यांनी त्यांची पत्नी श्वेता पन्याम (वय ४४) आणि १४ वर्षांच्या मुलाची हत्या केली. याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. किंग काऊंटी शेरिफ यांनी मुलांची ओळख गुप्त ठेवलेली आहे. हर्षवर्धन यांनी टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सिक्केरी यांचं कुटुंब अतिशय मनमिळाऊ आणि शांत होतं, अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली.

Indian businessman kills wife and son in US then end his life
Husband-Wife: नवरा बायकोमध्ये मध्यरात्री कडाक्याचं भांडण; बायको झोपायला गेली, नवऱ्यानं कात्री घेऊन केलं असं काही की..

२४ एप्रिल २०२५च्या संध्याकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलिसांना तीन मृतदेह सापडले. हर्षवर्धन आणि श्वेता यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला. हर्षवर्धन यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. या हत्या आणि आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हर्षवर्धन यांच्या घरी होते. हर्षवर्धन यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

हर्षवर्धन सिक्केरी कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील केआर पेट तालुक्याचे रहिवासी होते. रोबोटिक्स कंपनी होलोवर्ल्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. या कंपनीचं मुख्यालय म्हैसूरमध्ये आहे. त्यांची पत्नी श्वेता याच कंपनीची सहसंस्थापक होती. २०१७ मध्ये हर्षवर्धन आणि श्वेता भारतात परतले होते. त्यानंतर त्यांनी होलोवर्ल्डची सुरुवात केली. पण कोविड-१९ महामारीमुळे २०२२ मध्ये त्यांची कंपनी बंद पडली. त्यानंतर ते दोघे अमेरिकेला परतले.

Indian businessman kills wife and son in US then end his life
Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, ड्रग्ज देऊन बलात्कार, टोळीनं तरूणींचे प्रायव्हेट VIDEO शेअर करत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com