India vs Canada: कॅनडाच्या पंतप्रधानांचे भारतावर पुन्हा गंभीर आरोप, ताकदवर देशांची मनमानी घातक असल्याचं केलं वक्तव्य

India vs Canada: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदिप सिंह निज्जर याच्या हत्येवरून पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत.
India vs Canada
India vs CanadaSaam Digital
Published On

India vs Canada

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदिप सिंह निज्जर याच्या हत्येवरून पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. ताकदवर देशांची मनमानीपद्धताने योग्य अयोग्य ठरवू लागले तर हे देश कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांच उल्लंघन करत राहतील आणि हे खूप घातक असल्याचं म्हटलं आहे.

कॅनडाच्या एका पत्रकाराने ट्रूडो यांना निज्जरच्या हत्येसंदर्भातील तपासात प्रगती झाली आहे आणि नसेल तर अमेरिकेने कॅनडाच्या बाजूने भारताबाबत कठोर भूमिका घ्यावी का, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच उत्तर देताना जस्टीन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर केलेले आरोपांची पुनरावृत्ती केली.

कॅनडाच्या नागरिकाची कॅनडाच्या भूमीवर करण्यात आलेल्या हत्येत भारताचे एजंट सामिल असल्याची माहिती विश्वसनिय सूत्राकडून मिळाली होती. त्यानंतर भारताशी संपर्क करून या प्रकरणात कॅनडासोबत तपासात मदत करण्याचा आग्रह केला होता. आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आणि कॅनडाच्या सार्वभौमत्त्वावर काम करण्यासाठी अमेरिका आणि अन्य मित्र देशांशी संपर्क केला आहे. कॅनडाच्या भूमीवर झालेल्या हा प्रकार आपण गांभीर्याने घेतल्याच ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॅनडाचे मित्र आणि सहकाऱ्यांसोबत आम्ही काम करत राहणार आहे. तपास यंत्रणा आपलं काम करत राहतील. कॅनडा नेहमीच कायद्यांच पालन करतो. कारण जर ताकदवर देशच योग्य अयोग्य ठरवू लागले तर बडे देश कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांच उल्लंघन करत राहतील आणि हे खूप घातक असल्याचं ते म्हणाले.

India vs Canada
PM Modi Diwali: 'जिथे तुम्ही, तिथेच माझा सण', जवानांसोबत PM मोदींनी साजरी केली दिवाळी

भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना कॅनडाचे खासदार चंदन आर्य यांनी पार्लमेंट हिलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमंत्रिक केलं होतं. त्यावरून विचारलेल्या प्रश्नावर ट्रूडो म्हणाले, या गंभीर प्रकरणावर रचनात्मक पद्धतीने काम करण्याची आमची इच्छा आहे. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी भारत करकार आणि जगभरातील आमच्या सहकारी देशांशी संपर्क केला आहे. त्यामुळे भारताने ज्यावेळी व्हिएना कन्वेंशनच उल्लंघन केलं आणि कॅनडाच्या ४० राजकीय तज्ज्ञांना बोलावण्यास भाग पाडलं, त्यावरून आम्ही खूप निराश झालो.

भारतासोबत आम्ही प्रत्येक क्षणी रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोणातून काम केलं आहे, यापुढेही ते कायम असेल. अर्थातच भारताच्या राजकीय मुत्सद्यांसोबत काम चालू राहील. या मुद्द्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. मात्र आम्ही नेहमी कायद्याचा पुरस्कार करणार आहे. कारण कॅनडा कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवतो. भारत सरकारने निज्जरला आतंकवादी घोषित केलं होतं आणि १८ जूनला त्याची गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये त्याच हत्या करण्यात आली, यावरही जस्टीन ट्रूडो यांनी भर दिला.

India vs Canada
Uttarakhand Breaking News: उत्तराखंडमध्ये भूस्खलन, ४० कामगार अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com