PM Modi Diwali: 'जिथे तुम्ही, तिथेच माझा सण', जवानांसोबत PM मोदींनी साजरी केली दिवाळी

PM Narendra Modi in Lepcha: 'जिथे तुम्ही, तिथेच माझा सण', जवानांसोबत PM मोदींनी साजरी केली दिवाळी
PM Narendra Modi in Lepcha
PM Narendra Modi in LepchaSaam Tv
Published On

PM Narendra Modi in Lepcha:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे भारतीय सैन्यांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी ते म्हणाले की, ''हा एक समाधान आणि आनंदाने भरलेला क्षण आहे. मला विश्वास आहे की, ही दिवाळी माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासियांसाठी नवीन प्रकाश घेऊन येईल.'' यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'असे म्हणतात की जेथे कुटुंब आहे तेथेच सण साजरे होतात. सणासुदीच्या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर तैनात असणे, हेच कर्तव्यनिष्ठेचे शिखर आहे. प्रत्येकाला कुटुंबाची आठवण येते, पण तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही. तुमचा उत्साह कमी दिसत नाही. तुम्ही उत्साहाने भरलेले आहात, उर्जेने भरलेले आहात. कारण तुम्हाला माहित आहे की, 140 कोटी देशवासीयांचे हे मोठे कुटुंब देखील तुमचेच आहे आणि त्यामुळे देश तुमचा ऋणी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi in Lepcha
Pm Modi Net Worth: विमा पॉलिसी नाही, बँक खात्यात फक्त 574 रुपये; जाणून घ्या किती आहे PM मोदींची संपत्ती

नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील सध्याच्या परिस्थितीत भारताकडून सातत्याने अपेक्षा वाढत आहेत. ते म्हणाले, 'अशा महत्त्वाच्या काळात भारताच्या सीमा सुरक्षित राहणे, देशात शांततेचे वातावरण राहणे आणि यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. जोपर्यंत आपलं सैन्य हिमालयाप्रमाणे आपल्या सीमेवर खंबीर आणि अटल आहे, तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान म्हणाले, ''अयोध्या तिथेच आहे, जिथे प्रभू राम आहेत. माझ्यासाठी, जिथे भारतीय सैन्य आहे, जिथे माझ्या देशाचे सुरक्षा दल तैनात आहे, ती जागा कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. जिथे तुम्ही, तिथेच माझा सण आहे.''

PM Narendra Modi in Lepcha
Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंनी झणझणीत मिसळचा घेतला आस्वाद; बील देत कामगारांची दिवाळी केली गोड

पंतप्रधान मोदींनी जवानांना भरवली मिठाई

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर सैनिकांसोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते जवानांना मिठाई भरवताना दिसत आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''आपल्या कुटुंबापासून दूर असलेले, आपल्या राष्ट्राचे रक्षक आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळून टाकतात. आपल्या सुरक्षा दलांचे धैर्य अतूट आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com