भारत-अमेरिकेत तणाव वाढला, जहाजावरील हल्ल्यानंतर भारत आक्रमक

India US Tension: ओमानच्या आखातात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय खलाशांचे मृत्यू झालेत. भारतीय जहाजांवरील हल्ल्यांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीये. इतकंच नव्हे तर आता विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Indian merchant vessels in the Gulf of Oman amid rising tensions following deadly attacks on seafarers.
Indian merchant vessels in the Gulf of Oman amid rising tensions following deadly attacks on seafarers.saam tv
Published On

ओमानच्या आखातात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झालाय. ओमानच्या आखातात अमेरिकेनं भारतीय जहाजांना लक्ष्य केलं होतं. त्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या या कारवाईविरोधात भारतानं अमेरिकन राजदूतांना समन्स बजावत खडेबोल सुनावले. इतकंच नव्हे तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना फोन करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवलाय. मात्र, या हल्ल्यानंतरही अमेरिकेकडून मुजोरी कायम असल्याचं दिसतंय.

भारतीय जहाजांवर हल्ला करूनही अमेरिकेनं माफी मागण्यास नकार दिलाय. अमेरिकेनं घातलेल्या आर्थिक आणि व्यापारी कोंडीचं उल्लंघन करणे आणि इराणी तेलाची अवैध वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. यामध्ये भारतीय खलाशांना कोणतीही सूट मिळणार नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलंय.

खरंतर, व्यापारी जहाजांवर अशा प्रकारे युद्धसदृश हल्ला करणे, हा आंतरराष्ट्रीय कायद्यानं गुन्हा आहे. मात्र, असं असतानाही आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरलंय. भारतीय जहाजांवरील हल्ल्यांनंतर भारत आणि अमेरिकेतील मैत्रीत मिठाचा खडा पडलाय. त्यामुळे या तणावाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही तोंडसुख घेतलंय.

विशेष म्हणजे, अमेरिकेनं गेल्या 6 दिवसांत भारतीय खलाशी असलेल्या तीन जहाजांवर हल्ला केलाय. ही जहाजे अमेरिकेची नाकेबंदी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. यामुळे भारत-अमेरीकेमधील संबंध ताणले गेले आहेत. दुसरीकडे आखातातील अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com