२०३० पर्यंत भारत 'ड्रोन हब' बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

'ड्रोन तंत्रज्ञानाबाबत भारतात जो उत्साह दिसून येत आहे, तो आश्चर्यकारक आहे.'
Narendra Modi
Narendra ModiSaam TV
Published On

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर दोन दिवसीय 'ड्रोन महोत्सव २०२२' चे उद्घाटन केले. या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मोदींनी ड्रोन प्रदर्शनाची पाहणी केली. यादरम्यान बोलताना हे ड्रोन प्रदर्शनामुळे आपण प्रभावित झालो असल्याचं मोदी म्हणाले. (Drone Festival 2022)

तसंच २०३० पर्यंत भारत ड्रोन हब बनेल असा विश्वास मोदी (Narendra Modi) यावेळी व्यक्त केला. तसंच मी आज ड्रोन प्रदर्शनातील ज्या-ज्या स्टॉलवर गेलो ते सगळे अभिमानाने सांगत होते की हा ड्रोन 'मेक इन इंडिया' (Make in India) आहे असंही मोदींनी यावेळी सांगितलं. तसंच हा उत्सव फक्त ड्रोनचा नाही, तर हा 'न्यू इंडिया आणि न्यू गव्हर्नन्स'चा उत्सव असल्याचंही मोदी म्हणाले.

हे देखील पाहा -

ड्रोन तंत्रज्ञानाबाबत भारतात जो उत्साह दिसून येत आहे, तो आश्चर्यकारक आहे. ही ऊर्जा दृश्यमान असून ही ऊर्जा भारतातील रोजगार निर्मितीच्या मोठ्या क्षेत्राची क्षमता दर्शवत असल्याचं मोदी म्हणाले. शिवाय आठ वर्षांपासूनचा हा काळ आहे ज्यामु जेव्हा आम्ही भारतात सुशासनाचे नवे मंत्र राबवायला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी मोदींनी काँग्रेसवर (Congress) टीका केली ते म्हणाले, या पूर्वीच्या सरकार तंत्रज्ञानाला समस्येचा भाग मानत होते, तसंच तंत्रज्ञानाला त्यांच्याकडून गरीबविरोधी असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे २०१४ पूर्वी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनतेचे वातावरण होते. याचा सर्वाधिक त्रास गरीबांना, वंचितांना आणि मध्यमवर्गीयांना झाला. ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो आणि अंत्योदयाचे ध्येय गाठू शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com