
भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसवला आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले आहेत. याचा अधिकृत व्हिडिओ लष्काराकडून जारी करण्यात आला आहे. भारतीय सैन्यांनी आज पाकिस्तानमधील जवानांच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
भारतीय लष्कराने केलेल्या पोस्टमध्ये हा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'भारतीय लष्कराने दहशतवादी लाँचपॅड नष्ट केले. ८ आणि ९ मे २०२५ च्या रात्री जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादी लाँचपॅडवर समन्वित गोळीबार केला. हे लाँचपॅड आणि उद्ध्वस्त केले.'
तंसच, 'नियंत्रण रेषेजवळ असलेले पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे लाँचपॅड पूर्वी भारतीय नागरिक आणि सुरक्षा दलांविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे केंद्र होते. भारतीय लष्कराच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवादी पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का बसला आहे.', असे देखील भारतीय लष्कराने पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.