India Spadex satellite Launch: इस्रोने अंतराळात इतिहास रचला, स्पॅडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत ठरला चौथा देश

ISRO Spadex Launch Success: इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचे यश भारतीय अंतराळ स्थानकाचे (BAS) बांधकाम आणि चांद्रयान-4 मोहिमेचे यश निश्चित करेल. त्यामुळेच हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
India Spadex
ISRO Spadex Launch SuccessIndia Today
Published On

भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने सोमवारी रात्री 10:00 वाजता श्रीहरिकोटा येथून PSLV रॉकेटद्वारे स्पॅडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग प्रयोग) लाँन्च केलं. इस्रोने या कामगिरीनंतर भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील 'महत्त्वाचा टप्पा' असे वर्णन केलंय. इस्रोच्या या मोहिमेचे यश भारतीय अंतराळ स्थानकाचे (BAS) बनवणे आणि चांद्रयान-4 मोहिमेचे यश ठरवेल, असा विश्वास आहे. त्यामुळेच हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे मानले जातंय.

या मोहिमेत दोन उपग्रह आहेत. पहिला चेसर सॅटेलाईट आणि दुसरा टार्गेट. चेझर उपग्रह टार्गेटला पकडले आणि डॉकिंग करणार. यासह आणखी एक महत्त्वाची परीक्षा असू शकते. उपग्रहातून एक रोबोटिक आर्म बाहेर आलेत. जे हुकद्वारे म्हणजेच टेथर्डद्वारे टार्गेटला स्वतःकडे खेचून घेईल. हे टार्गेट वेगळ्या क्यूबसॅट असू शकतात. या प्रयोगामुळे भविष्यात इस्रोला कक्षेतून बाहेर पडून वेगळ्या दिशेने जाणाऱ्या उपग्रहांना पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळेल.

यासह कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पॅडेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयान अंतराळात एकमेकांशी जोडलेले दाखवले जातील. यासह कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पॅडेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयान अंतराळात एकमेकांशी जोडलेले दाखवले जातील.

भारत ठरला जगातील चौथा देश

एकाच मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपण करत असताना हे तंत्रज्ञान आवश्यक असल्याचे इस्रोने म्हटलंय. हे मिशन यशस्वी झाल्यास भारत हा जगातील चौथा देश बनेल ज्यांनी हे तंत्रज्ञान मिळवलंय. आतापर्यंत हे तंत्रज्ञान फक्त अमेरिका, चीन आणि रशियाकडे आहे.

SpaDeX (Space Docking Experiment) मोहीम इस्रोच्या कमी खर्चातील तंत्रज्ञान मिशन आहे. याचा उद्देश PSLV च्या रॉकेटच्या मदतीने अंतरिक्षमध्ये दोन छोटे म्हणजे डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या प्रक्रियेला पुर्ण करण आहे. इस्रोनुसार ही पद्धत भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहीम जसे की, चंद्रावर मनुष्य पाठवण्याची मोहीम, चंद्रावरून नमूने आणणं, भारतीय अंतराळ स्टेशन तयार करणे आणि संचालनासाठी ही मोहीम खूप महत्त्वाची आहे.

चांद्रयान-4 साठी अंतराळात डॉकिंग हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. डॉकिंग म्हणजे दोन वेगवेगळ्या भागांना एकमेकांकडे आणून जोडणे. अंतराळातील दोन भिन्न गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदत करेल. चांद्रयान-4 प्रकल्पातही त्याची मदत होईल. स्पाडेक्स म्हणजे एकाच उपग्रहाचे दोन भाग जे एकाच रॉकेटमध्ये ठेवून प्रक्षेपित केले गेलेत. हे दोघे अवकाशात वेगवेगळ्या ठिकाणी सोडले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com