L&T Group Created New World Record: अवघ्या 100 तासात बनवला 100 किलोमीटरचा रस्ता, NHAI चा आणखी एक विश्वविक्रम

World Record: अवघ्या 100 तासात बनवला 100 किलोमीटरचा रस्ता, NHAI चा आणखी एक विश्वविक्रम
L&T Group Created New World Record
L&T Group Created New World RecordSaam TV

L&T Group Created New World Record: लार्सन अँड टुब्रो ग्रुपने अवघ्या 100 तासांत 100 किमीचा नवीन रस्ता तयार करून नवा विश्वविक्रम केला आहे.

इतकेच नाही तर 2000 कर्मचाऱ्यांना 24 तास कामाला लावून अवघ्या 100 तासांत 100 किमीचा रस्ता तयार करून 75 तासांत 75 किमीचा रस्ता तयार करण्याचा जुना विक्रम लार्सन अँड टुब्रोने मोडला आहे.

L&T Group Created New World Record
Adani-Hindenburg Row: हिंडेनबर्ग प्रकरणी अदानी समूहाला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टच्या समितीने दिली क्लीन चिट

हा रस्ता गाझियाबाद ते बुलंदशहर अलीगढ येथे रस्ता तयार करण्यात आला. लार्सन अँड टर्बोच्या यशाबद्दल बुलंदशहर येथील एका रिसॉर्टमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे टीमचे अभिनंदन केले आहे. (Latest Marathi News)

L&T Group Created New World Record
Political News: सुषमा अंधारे प्रकरणाचे मुंबईत पडसाद? ठाकरे गटाच्या नियोजित बैठकांना ब्रेक

लार्सन अँड टुब्रो टीमने रात्रंदिवस मेहनत करून 100 लेन किलोमीटर ओव्हर लॅप रोड अवघ्या 100 तासांत तयार केला. यादरम्यान 2,000 कर्मचाऱ्यांनी 100 किमीचा रस्ता तयार करण्यासाठी 24×7 काम केले आहे. यापूर्वी 75 तासांत 75 किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचा जागतिक विक्रम होता. जो मोडून L&T ने नवा विश्वविक्रम केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com