Political News: सुषमा अंधारे प्रकरणाचे मुंबईत पडसाद? ठाकरे गटाच्या नियोजित बैठकांना ब्रेक

Political News: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySAAM TV

निवृत्ती बाबर

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेद बीडमध्ये समोर आले आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाची सभा बीडमध्ये होत आहे, त्याआधीच ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

बीडमधील घटनेनंतर ठाकरे गटाने सावध भूमिका घेत पक्षाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या लोकसभानिहाय आढावा बैठकांना अचानक ब्रेक लावल्याची चर्चा आहे. आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Beed Mahaprabodhan Yatra: पक्षातून हक्कालपट्टी होऊनही आप्पासाहेब जाधव ठाम, पुन्हा सुषमा अंधारेंवर केला गंभीर आरोप

याशिवाय ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबाबतही साशंकता उपस्थित होत आहे. काल सुरू झालेल्या विभागनिहाय बैठकांना दुसऱ्याच दिवशी ब्रेक लागल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुषमा अंधारे प्रकरणाचा बैठकांवर परिणाम झाल्याची चर्चाही रंगू लागली आहे. (Political News)

Uddhav Thackeray
Shah Rukh Khan Chats Viral: प्लीज माझ्या मुलाची काळजी घ्या, शाहरुखने मेसेज केल्याचा समीर वानखेडेंचा दावा, व्हाट्सअॅप चॅटिंग आले समोर

बीडमध्ये काय घडलं?

बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ जारी करत सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे पैसे घेऊन पद वाटप करत आहेत. यासह अनेक गंभीर आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पासाहेब जाधव यांनी केले होते.

यामुळेच मी त्यांना दोन चापटा लावल्या असा दावा त्यांनी व्हिडिओमध्ये केला होता. या दाव्यानंतर आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com