Gold Mine: भारताला जॅकपॉट ! देशात सापडली सोन्याची खाण, अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडणार

Gold Mine Found In India: भारताच्या हाती मोठा खजिना सापडला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापडले आहेत. कोणते राज्य आहे ? आणि किती सोन्य़ाचा साठा सापडलाय ? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Gold Mine
Gold Mine Found In Indiasaam Tv
Published On

जहाँ डाल डाल पें सोने की चिडीयॉं करती बसेरा वह भारत देश है मैरा..असं वर्णन भारताचं केलं जातं होतं. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं. देशात सोन्याचा दर काही दिवसांतच एक लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीतच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

भारतात सोन्याची खाण सापडलाय.तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनीही सोन्याचा खाण शोधून काढलीय. पाहूया कुठे सापडलीय ही सोन्याची खाण. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिजांचं केंद्र मानलं जाणारं ओडिशा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आलं आहे. शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला आहे.

नजीकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणींचा लिलाव केला जाणार आहे. खडकांचा आणि खनिजांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना ओडिशातील सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार आणि देवगड या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याच्या शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. असंही भारतीयांच सोन प्रेम काही कमी नाही.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे 24,000 टन सोने आहे. जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 11% आहे. एकीकडे सोन्याच्या किंमती सर्वसामान्यांच्या ावाक्याबाहेर जात असताना ओडीशातील सोन्याचा साठा दिलासादायक आहे. यामुळे ओडीशाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com