India Corona Update: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, 24 तासांत 14 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
India Corona Update
India Corona UpdateSaam Tv
Published On

नवी दिल्ली - देशात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आरोग्य विभागासह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 14, 506 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोनाची लागण झालेल्या 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 11 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

यापूर्वी मंगळवारी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. मंगळवारी कोरोनाचे 11,793 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, सोमवारी 17,073 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 602 झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुमारे २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशभरात कोविड संसर्गामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5 लाख 25 हजार 77 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रकरणे वाढली आहेत

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुमारे 47 टक्क्यांची वाढ दिसून आली. गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,482 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी ५ जणांचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईत 1290 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, दिल्लीत 874 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

India Corona Update
भाजपचे सर्वच आमदार मुंबईकडे रवाना; 5 वाजता बैठक

देशातील कोविड-19 ची ताजी आकडेवारी

•गेल्या २४ तासांत १४,५०६ नवीन प्रकरणे

• गेल्या 24 तासांत 30 जणांचा मृत्यू झाला

• सक्रिय प्रकरणांची संख्या 99,602 पर्यंत वाढली आहे

• देशात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या - 5 लाख 25 हजार 77

• देशात आतापर्यंत संक्रमित लोक - 4 कोटी 34 लाख 33 हजार 345

• एका दिवसात कोरोना बाधित रुग्ण बरे झाले - 11 हजार 574

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com