India Vs China : भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैन्यांमध्ये झटापट; चकमकीचा व्हिडिओ आला समोर

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैन्यांमध्ये झटापट झाली.
India Vs China
India Vs ChinaSaam Tv
Published On

India-China face-off : अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैन्यांमध्ये झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना ९ डिसेंबरची आहे. या चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

९ डिसेंबर रोजीच्या रात्री तवांगमध्ये चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पोहचले होते. यावेळी चीनचे जवळपास ६०० हून अधिक सैनिक होते. चीनचे सैन्य समोर आल्यानंतर भारतीय जवानांनी सुद्धा त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. चीनचे सैन्य संपूर्ण तयारीनिशी आले होते. मात्र, त्यांना भारतीय जवानांनी (Indian Army) केलेल्या तयारीची कल्पना नव्हती.

या घटनेत दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये जोरदार झटापट झाली. भारतीय लष्कराने चीनच्या ६०० जवानांना चोख प्रत्त्युतर दिलं. या झटापटीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाले. जखमी चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. या चकमकीत २० भारतीय जवान जखमी झाले. त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता ९ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

India Vs China
India-China Clash : ड्रॅगनची वक्रदृष्टी, ५ घटना अन् जिगरबाज भारतीय जवान; कसा हाणून पाडला चिन्यांचा डाव?

भारत-चीन सैन्याच्या चकमकीनंतर केंद्र सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जारी

अरुणाचल प्रदेशात चीन सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये तणावाची घटना घडल्यानंतर केंद्रातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. चिनी सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

केंद्राने सरकारची विविध मंत्रालये आणि पीएसयूमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एका SOP चं अर्थात स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात बेसिक आयटी हायजीनसारखे संगणक बंद करणे, ईमेलमधून साइन ऑउट करणे, पासवर्ड अपडेट करणे यांसारख्या सूचना आहेत. या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केले तर संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com