
सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
भारताने अखेर इतिहास घडवलाय. अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारलीय. अमेरिकेने भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय अर्थव्यवस्थेने महासत्तांच्या स्पर्धेत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवलाय. आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था आणि त्यांचा जीडीपी किती आहे? पाहूयात..
भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर
देश- नॉमिनल जीडीपी
अमेरिका - 30.507 ट्रिलियन डॉलर
चीन- 19.231 ट्रिलियन डॉलर
जर्मनी- 4.744 ट्रिलियन डॉलर
भारत- 4.187 ट्रिलियन डॉलर
जपान- 4.186 ट्रिलियन डॉलर
जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यामागे अमेरिका आणि इतर देशांनी लादलेले शुल्क आणि व्यापारी धोरणे कारणीभूत आहेत. तर दुसरीकडे भारताची अर्थव्यस्था चौथ्या क्रमांकावर पोहचण्यामागे देशातील पायाभूत प्रकल्पात होणारी वाढती गुंतवणुक, कार्यक्षम तरुण लोकसंख्या, IT आणि सेवा क्षेत्राचा झपाट्याने झालेला विकास अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर सीईओ बी.वी.आर सुब्रह्मण्यम यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हटलं पाहूयात...
IMF च्या अंदाजानुसार, जर भारताचा विकास दर असाच राहिला तर भारत 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकून 4.9 ट्रिलियन डॉलर्सचा जीडीपी असणारी जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यामुळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. तसेच गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होईल. त्यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी कशाप्रकारे आगेकूच करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.