भाजपला पराभूत करण्यासाठी 'इंडिया' आघाडी कामाला लागली असून पुढील निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत पंतप्रधानपदाचा नेता कोण असेल याचे संकेत मिळाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे ठरवण्यात आले आहे.
मंगळवारी दिल्ली येथे इंडिया आघाडीची चौथी बैठक पार पडली. या बैठकीत १६ राजकीय पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पीएम पदासाठी पसंती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं होतं. आता ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कोणता उमेदवार निवडणूक लढवेल त्याचे नाव सुचवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॅनर्जी यांनी प्रियांका गांधी ह्याना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मैदानात उतरवलं जाणार आहे. प्रियांका गांधी ह्या वाराणसीतून निवडणूक लढवतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
ममता बॅनर्जीं यांनीच प्रियांका गांधी यांचे नाव सुचवलं आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीतही त्यांनी खरगे याचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं. याच बैठकीत बॅनर्जी यांनी प्रियांका यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला. इंडिया आघाडीत पीएम पदाचा उमेदवार कोण आहे, याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत, म्हणून मी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सांगितल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
दलित नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार असावा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. दरवेळी लोक तुमचा चेहरा कोण अशी विचारणा करत आहेत. म्हणून आपण प्रस्ताव ठेवला होता की खरगे यांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दिलं पाहिजे. ते जर पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही. असं ममता बॅनर्जी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. केजरीवालसह १६ राजकीय पक्षांनी खरगेंच्या नावाला पसंती दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.