वृत्तसंस्था: कोरोना व्हायरसने देशामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा (Corona) कहरच बघायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसाअगोदर देशामध्ये कोरोनाचा (Corona)धोका वाढला आहे. रुग्णांची संख्या देखील वाढतच होती. मात्र, आता सध्या देशामध्ये कोरोनाचा वेग मंदावताना दिसून आहे.
हे देखील पहा-
देशामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल ३ कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र हे सर्व असताना या दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाविषयी (Corona) आता सुखावणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात कोरोनाचे १९ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.
भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल ३ कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात ५ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) याविषयी माहिती दिली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासामध्ये कोरोनाचे १९९६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे देशात आतापर्यंत ५,११,९०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. ४,२०,८६,३८३ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. मार्च २०२० पासून जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ५१०००० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.