Menstrual Leave : मासिक पाळीच्या काळात कॉलेज तरुणींना सुट्टी, 'या' सरकारचा महत्वाचा निर्णय

केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण अन्य राज्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष
Kerala News
Kerala NewsSaam Tv
Published On

Menstrual Leave News : केरळ सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीत आराम मिळावा यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांंनी तशी घोषणा केली आहे.

याआधी, कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने आपल्या विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी सर्व विद्यापीठांमध्ये याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kerala News
Crime News : चोरीसाठी विमानाने यायचे; दिल्लीतच्या चोरांचा मुंबईत धुमाकूळ

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात महिला विद्यार्थिनींना दोन टक्के अतिरिक्त सूट देण्यास मान्यता देण्यात आल्याचे कोचीन विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता मासिक पाळीच्या दिवसात त्रास होत असल्यास विद्यार्थिनींना अतिरिक्त सुट्टीचाही लाभ घेता येणार आहे. 

दुसरीकडे, महिलांना मासिक पाळी (Mensural Period) दरम्यान दर महिन्याला कामावरून सुटी देण्यात यावी या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.  या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. त्याआधीच केरळ (Kerala) सरकारने महाविद्यालयीन (College) विद्यार्थिंनींसाठी मासिक पाळीची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे आता केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण अन्य राज्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kerala News
Maharashtra : सर्व बोर्ड, विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार; शिक्षकेतर कर्मचा-यांनी उपसले संपाचे हत्यार

कोचीन विद्यापीठाच्या निर्णयाचे कौतुक

प्रत्येक सेमिस्टरमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. परंतु कोची विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने विद्यार्थिनींची 73 टक्के उपस्थिती असली तरीही त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना २ टक्के सूट देण्यात आली आहे. कोचीन विद्यापीठाचे कौतुक करत आता केरळ सरकारने सर्व विद्यापीठांसाठी हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com