Inflation Rate : महागाईनं 'होरपळ' सुरू असतानाच, सर्वसामान्य जनतेला आगामी दिवसांत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात 'महागाईची लाट' ओसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महागाईचा दर ३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील ६.८ टक्क्यांहून कमी होऊन, पुढील आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
सन २०२४ मध्ये यात आणखी घट होऊन ४ टक्क्यांपर्यंत येईल, असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं हा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत माहिती देताना, IMF च्या संशोधन विभागाचे प्रमुख डॅनियल लेह म्हणाले, "इतर देशांप्रमाणेच भारतातील महागाई सुद्धा 2022 मधील 6.8 टक्क्यांवरून 2023 मध्ये 5 टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे." 2024 मध्ये ही महागाई आणखी 4 टक्क्यांवर येईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
IMF ने आपल्या अहवालात काय म्हटलंय?
IMF ने मंगळवारी 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक' वर सुधारित अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार, सुमारे 84 टक्के देशांमध्ये 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ कमी होईल. अहवालात असे म्हटले आहे की 2022 मध्ये 8.8 जागतिक चलनवाढ टक्क्यांवरून (वार्षिक सरासरी) 2023 मध्ये 6.6 टक्के होईल. पुढे 2024 मध्ये याच महागाईत 4.3 टक्के इतकी घट होईल. कोरोना महामारीच्या आधी (2017-19) महागाई दर सुमारे 3.5 टक्के इतका होता.
जगभरात महागाई कमी होण्याची शक्यता
सध्या चलनवाढीचा अंदाज कमी होण्याचे प्रमाण अंशतः आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती आणि गैर-इंधन किमतींवर आधारित आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात होणारी सातत्याने घसरण पाहता, आगामी काळात महागाईमुळे दिलासा मिळू शकतो. येणाऱ्या काही महिन्यांत चलनवाढ 2022 च्या चौथ्या तिमाहीत 6.9 टक्क्यांवरून वार्षिक आधारावर 2023 च्या चौथ्या तिमाहीत 4.5 टक्क्यांवर येईल, असं IMF ने म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.