Shocking: बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं, नवऱ्याची सटकली; दाताने बायकोच्या नाकाचा लचका तोडला

Uttar Pradesh Crime: बायकोच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल नवऱ्याला कळाले. बायकोला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पाहून नवऱ्याची सटकली. रागाच्या भरात त्याने बायकोच्या नाकाचा लचका तोडून काढला.
Shocking: बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं, नवऱ्याची सटकली; दाताने बायकोच्या नाकाचा लचका तोडला
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

विवाहबाह्य संबंधावरून हत्या, मारहाण, अपरहण यासरख्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. नवरा-बायको एकमेकांवर हल्ले करत असल्याचा घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच एक घटना घडली. दोन मुलांच्या आईचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या महिलेला तिच्या नवऱ्याने बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने या महिलेच्या नाकाचा दाताने लचका तोडला आणि तिला रक्तबंबाळ केलं. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात ही घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या महिलेला दोन मुलं देखील आहेत. महिलेच्या पतीला तिच्या प्रेमसंबंधाविषयी माहिती नव्हते. ही महिला बॉयफ्रेंडला गुपचूप भेटायची. महिलेच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती तिच्या नवऱ्याला मिळाली. महिला नेहमीप्रमाणे गुपचूप आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली. या महिलेचा नवरा त्याठिकाणी पोहचला. या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला त्याने आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

Shocking: बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं, नवऱ्याची सटकली; दाताने बायकोच्या नाकाचा लचका तोडला
Crime: ८ महिन्यांच्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार, बंदुकीचा धाक दाखवत हैवानांनी शरीराचे लचके तोडले

ही महिला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करत होती. आपल्या बायकोला तरुणाच्या मिठीत पाहून या व्यक्तीचा राग अनावर झाला. त्याने या दोघांना विरोध केला. यावेळी नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात या वक्तीने दाताच्या सहाय्याने बायकोच्या नाकाचा लचका तोडून काढला. या घटनेमुळे महिला जखमी झाली. ती पूर्णपणे रक्ताने माखली होती.

Shocking: बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं, नवऱ्याची सटकली; दाताने बायकोच्या नाकाचा लचका तोडला
Pune Crime: हातपाय बांधले, तोंडांत बोळा कोंबला...; बालकाश्रममध्ये २ अल्पवयीन मुलांवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, पुणे हादरले

नवऱ्याने नाकाला चावा घेतल्यामुळे महिला वेदनेन ओरडत होती. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या कुटुंबाने जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली. महिलेला पुढील उपचारासाठी लखनऊला हलवण्यात आले. महिलेने नवरा आणि सासरच्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

Shocking: बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं, नवऱ्याची सटकली; दाताने बायकोच्या नाकाचा लचका तोडला
Beed Crime : धक्कादायक! दागिन्यांसाठी वृद्धेचा कान तोडला; बीडच्या लाडेवडगाव शिवारात धाडसी दरोडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com