Gold Hallmark: जुन्या सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग कसे करायचे? जाणून घ्या किती रुपये येईल खर्च

भारत सरकारने सोन्याच्या (Gold) दागिन्यांसंदर्भात आता नवा नियम लागू केला आहे.
Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark price
Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark priceSaam tv
Published On

मुंबई: भारत सरकारने सोन्याच्या (Gold) दागिन्या संदर्भात नवा नियम लागू केला आहे. १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी आणि दागिन्यांच्या कलाकृतीसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. फक्त प्रमाणित सेल्स आउटलेटवर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्स द्वारे रजिस्टर ज्वेलरच हॉलमार्कचे सोन्याचे दागिन्यांची विक्री करु शकतो, पण जुन्या विना हॉलमार्किंगवाल्या दागिन्यांचे काय होणार? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. त्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग कसे करुन घ्यायचे, या प्रक्रियेला खर्च किती रुपये येतो. चला जाणून घेऊया. (Gold Latest News)

Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark price
सर्वात मोठी बातमी! सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

तुम्हाला जर तुमच्या जवळ असलेल्या जुन्या सोन्याचे (Gold) दागिने हॉलमार्किंग करुन घ्यायचे असेल तर यासाठी एक प्रक्रिया आहे. हॉलमार्किंग सर्टिफिकेशन हे हॉलमार्किंग सेंटरद्वारे केले जाते. हे सेंटर, बुरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स कडून मान्यताप्राप्त असले पाहिजेत. हॉलमार्किंग सेंटरमधून सोन्याचे हॉलमार्किंग करून घेण्यापूर्वी सराफांकडे बुरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्सचे लायसन्स असणे आवश्यक आहे.

हॉलमार्किंग सेंटरमध्ये दागिन्यांची शुद्धता तपासली जाते. ही चाचणी झाल्यानंतर हॉलमार्किंग सेंटर दागिन्यांवर त्यांच्या शुद्धतेप्रमाणे हॉलमार्कचे निशाण लावली जाते. जुन्या सोन्याच्या दागिने वितळवून नवे प्रॉडक्ट बनवले जाते. या दागिन्यांना पुन्हा बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केले जाते.

Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark price
Birth Control Pill: आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी महिलांसाठी सुरक्षित असते का?

हॉलमार्किंगसाठी खर्च किती रुपये येतो?

जर तुम्ही जुन्या सोन्याचे (Gold) दागिने हॉलमार्किंग करुन घेणार असाल तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार आहेत. सोन्याच्या दागिन्यांसाठी ३५ रुपये प्रति तुकडा आणि चांदीसाठी २५ रुपये प्रति तुकडा. यात दागिन्यांचे वजनावर कितीही असू शकते. चार आर्टिकल्सपर्यंत सोन्याच्या दागिन्यांच्या तपासणीसाठी २०० रुपये आणि पाच पेक्षा जास्त आर्टिकल्ससाठी अतिरिक्त ४५ रुपये प्रति आर्टिकलसाठी लागू केले जातात. प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्वेलर कोणतेही शुल्क लागू करु शकत नाहीत.(Gold hallmark price)

BIS काय आहे?

बीआयएस (BIS) एक अशी एजन्सी आहे, ज्यात भारत सरकारद्वारे सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगसाठी प्रमाणन योजना सुरू करण्यासठी मान्यता मिळाली आहे. जर तुम्ही हॉलमार्किंगचे सोने खरेदी केले तर तुम्हाला बीआयएसच्या अॅपवर व्हेरिफाईड सुविधेचा उपयोग करुन याची शुद्धता तुम्ही तपासू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com