भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १८ जणांचा मृत्यू

Bus Accident in Bilaspur : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठा अपघात झाला. भल्लू पुलावर एक बसवर डोंगराचा काही भाग कोसळलाय. या अपघातात १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.
Bus Accident in Bilaspur
Devastating tragedy in Bilaspur, Himachal Pradesh — a moving bus buried under hill debris; 15 dead, several injured.saamtv
Published On
Summary
  • हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात डोंगराचा भाग बसवर कोसळला.

  • अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी झाले आहेत.

  • स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत.

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठा अपघात झाला. भल्लू पुलावर एक बसवर डोंगराचाह काही भाग कोसळला. बसवर ढिगारा कोसळल्यानंतर प्रवाशांनी आरडा-ओरडा केला. दरम्यान या अपघातात १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते अशी माहिती हाती आलीय. पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झालेत. जेसीबीच्या मदतीने मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे.

इंडुता भागात बरठीच्या भल्लू पुलाजवळ मंगळवारी एका बसचा भीषण अपघात झाला. या पुलावरून एक बस जात होती. त्यावेळी बसमध्ये ३० प्रवासी होते. धावत्या बसवर डोंगराचा काहीसा भाग कोसळला. डोंगराचा ढिगारा कोसळल्यानंतर प्रवाशांच्या आरडाओरडनंतर स्थानिकांनी पुलाकडे धाव घेतली. त्यानंतर प्रवाशांना बसच्या काढण्यासाठी मदत सुरू केली. तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलं. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जेसीबी बोलावत बसवरील ढिगारा हटवला. त्यानंतर जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेने घुमरविन झंडुता रुग्णालयात नेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com