Honduras Jail : मध्य अमेरिकेतील होंडुरासमधील महिलांच्या तुरुंगात मंगळवारी झालेल्या हाणामारीत 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवैध कामांवरुन महिलांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात कैद्यांचा जळून मृत्यू झाला.
होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी सांगितले की, बहुतेक कैद्यांचा मृत्यू हा होरपळून झाला आहे. तर इतरांना गोळ्या घालण्यात आल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबार आणि चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किमान सात महिला कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Marathi Tajya Batmya)
तुरुंगांमधील बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी अलीकडे केलेल्या प्रयत्नांमुळे हा वाद सुरु झाला. त्यामुळे मंगळवारी कारागृहात हिंसाचार झाला. कारागृहातील संघटित टोळ्यांविरोधात पावले उचलली जात असल्याचे कारागृह प्रशासाने सांगितले. (Latest Marathi News)
होंडुरासमधील तुरुंगाची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. जेलमध्ये अत्यंत अस्वच्छता आहे. अनेकदा येथील तुरुंगात हाणामारीच्या घटना घडत असतात. 2019 मध्येही अशाच प्रकारच्या हिंसाचारात 37 कैद्यांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.