देहरादून: देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलंय. उत्तराखंड राज्यात भाजपकडून जोरदार प्रचार सुरु आहे. काल (११ फेब्रुवारी) आसाम राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) हे भाजपच्या प्रचारासाठी उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये (Uttarakhand Assembly Election 2022) आले होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) हल्ला चढवला, मात्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करत असताना सरमा यांची जीभ घसरली. "राहुल गांधी हे राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचेच सुपुत्र आहे याचा पुराव कुणी राहुल गांधींकडे मागितला का?" असा वादग्रस्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. कॉंग्रेसने सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्राकडे याचे पुरावे मागितले होते. कॉंग्रेसच्या याच भुमिकेवर टीका करत असताना मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींबाबत हे वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) केलं आहे. (Himanta Biswa Sarma Controversial Statement on Rahul Gandhi and His Father Rajiv Gandhi)
हे देखील पहा -
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा नेमकं काय म्हणाले?
आसामचे मुख्यमंत्री तथा भाजप (BJP) नेते हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, "भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike On Pakistan) केले याचे पुरावे (Evidence) राहुल गांधींना हवे आहेत. पण, आम्ही तुम्हाला (राहुल गांधींना) विचारलं का, की तुम्ही राजीव गांधी यांचेच पुत्र आहात म्हणून? आम्ही याबाबत कधी तुमच्याकडे पुरावा मागितला का? जर आमचे आमचे सैनिक म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईक झालंय तर त्याचा पुरावा मागण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" असं खोचक आणि वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले की, राहुल गांधींना उत्तराखंडच्या सुपुत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा काहीही अधिकार नाही, जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) म्हणाले की, आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं, ते आम्ही स्विकारलं. कारण, आमच्यासाठी आमचा देश आणि सैनिक सर्वात अग्रस्थानी आहेत.
सोबतच ते म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच देशाच्या सन्मानाला धक्का लावण्याचं काम केलं आहे. काँग्रेसनंच ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू केल्याचंही ते म्हणाले. "कधी-कधी मला वाटतं की, जीनांचा आत्मा काँग्रेसमध्ये शिरला आहे." असं म्हणत ते म्हणाले की मदरसा उघडणे योग्य आहे, मुस्लिम विद्यापीठ उघडणे योग्य आहे. इतकंच नाही तर कॉंग्रेस हिजाब घालण्याची वकिली करते.
हिबाज प्रकरणावर वक्तव्य:
हिजाबाबत (Hijab Row) हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, सर्व इस्लामिक देश हिजाब आवश्यक नसल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हिजाब घाला असे म्हणत आहेत, पण तुम्ही लोक इंजिनीअरिंग, मेडिकल शिका आणि तुम्ही विद्यापीठात जा, असे त्यांते एकही विधान मिळणार नाही. यासोबत ते म्हणाले, 'विद्यार्थीनीने हिजाब घातला असेल तर, विद्यार्थीनीला शिकवलेलं समजतंय की नाही हे शिक्षकाला कसं कळणार? तीन वर्षांपूर्वी त्यांना हिजाब घालायचा आहे असं कोणीही म्हटलं नाही? मुस्लिम समाजाला शिक्षणाची गरज आहे, हिजाबची नाही. हा राजकीय इस्लाम काँग्रेस प्रायोजित आहे, अशीही टीका त्यांनी केली.
कॉंग्रेसचं प्रत्युत्तर:
राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कॉंग्रसने याचा जोरदार निषेध केल आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री तथ कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा निषेध करत "जेव्हा मनुष्याचा अंत जवळ येतो, तेव्हा सर्वात अगोदर त्याचा विवेक मरतो" (जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है।) अशी टीका केली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.