पॅराग्लायडिंग करताना अपघात; पायलट १३,५०० फूट उंचीवरून कोसळला

Fourth Paragliding Accident in 10 Days at Bir Billing: हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ १३,५०० फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना ऑस्ट्रेलियन पायलटचा अपघात झाला. हवामानामुळे क्रॅश लँडिंग झाली.
Fourth Paragliding Accident in 10 Days at Bir Billing
Fourth Paragliding Accident in 10 Days at Bir BillingSaam
Published On
Summary

मनालीजवळ ऑस्ट्रेलियन पायलटचा अपघात घडला.

पॅराग्लायडिंग करताना अपघात घडला.

पायलटला २० तासांनंतर बचाव पथकानं वाचवलं.

हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करताना पायलटचा अपघात घडला आहे. मनालीजवळ ५१ वर्षीय ऑस्ट्रेलियन पायलटला क्रॅश लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, सेव्हन सिस्टर्स पीक रेंजमध्ये १३,५०० फूट उंचीवर हा अपघात झाला. हवेचा दाब आणि हवामानामुळे पायलटला क्रॅश लँडिंग करावी लागल्याची माहिती आहे. पायलटला दुखापत झाली असून, सुदैवाने त्याचा जीव वाचला.

या घटनेची माहिती बीर बिलिंग पॅराग्लायडिंग असोसिएशनला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात केली. बीर असोसिएशनने अॅडव्हेंचर टूर असोसिएशनला माहिती दिली. मनालीहून एक बचाव पथक रात्री उशिरा पाठवण्यात आले.

Fourth Paragliding Accident in 10 Days at Bir Billing
दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा अन्... कोल्हापुरात बँक मॅनेजरची निर्घृण हत्या, बार वेटरसोबत वाद घालणं भोवलं

अॅडव्हेंचर टूर असोसिएशनच्या बचाव पथकाचे प्रमुख रमेश कुमार जोगी यांनी सांगितले की, 'मनालीजवळ १३,५०० फूट उंच डोंगरावर एका ऑस्ट्रोलियन पॅराग्लायडर पायलटला सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे', त्यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन पॅराग्लायडर पायलट सुमारे २० तास जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, आता पायलट आता सुरक्षित आहे.

Fourth Paragliding Accident in 10 Days at Bir Billing
'ती फक्त तळहातावर सुसाईड नोट लिहून...' डॉक्टर तरूणीच्या भावाला वेगळाच संशय

अलिकडेच हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथून उड्डाण घेतल्यानंतर एका कॅनेडियन महिला पायलटचा क्रॅश लँडिंगचा मृत्यू झाला. त्यानंतर बारोट पर्वतांमध्ये एका फ्रेंच पायलटचा अपघात झाला. या व्यतिरिक्त मनालीहून परतताना आणखी एका परदेशी पायलटचा अपघात झाला. सुमारे दहा दिवसांत हा चौथा अपघात असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com