Accident: भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू

Himachal Pradesh Car Accident: हिमाचल प्रदेशमध्ये भरधाव कार दरीत कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली.
Accident: भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू
Himachal Pradesh Car AccidentSaam Tv
Published On

हिमाचल प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा उपविभागातील चानवास भागात गुरूवारी रात्री हा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट ५०० मीटर खोल दरीत पडली. या अपघातात कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चाणवास येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक राजेश कुमार, त्याच्या पत्नी आणि दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातामध्ये राजेश कुमार यांच्या मेहुण्याचा आणि कारचालकाचाही मृत्यू झाला.

Accident: भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू
Navi Mumbai Accident : नवी मुंबईत अपघाताचा थरार! मद्यधुंद पोलिसानं दुचाकीस्वाराला उडवलं, VIDEO

राजेशकुमार हे आपल्या कुटुंबीयांसोबत कारमधून प्रवास करत होते. राजेश हे आपल्या पत्नीसोबत मुलगी (१७ वर्षे) आणि मुलाला (१५ वर्षे) बानीखेतहून घरी परत आणत होते. त्यांची मुलं बानीखेतमध्ये शिक्षण घेत होते. राजेश यांच्या कुटुंबातील ४ जण त्यांचा मेहुणा हेमराज आणि गावातील एक जण असे ६ जण कारमधून गावाच्या दिशेने जात होते. पण गावामध्ये पोहचण्यापूर्वीच भयंकर घडले. गावापासून सुमारे एक किलोमीटर आधी भांजराडू ते चाणवास शाहवा रस्त्यावर त्याच्या कारला अपघात झाला.

Accident: भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident: मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, पण परत आल्याच नाहीत; कारच्या धडकेत २ जिवलग मैत्रिणींचा मृत्यू

रात्रीच्या वेळी स्विफ्ट कार ५०० मीटर दरीत कोसळली. कारमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य करत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Accident: भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident: डंपरला ओव्हरटेक करायला गेले अन् भयंकर घडलं, चाकाखाली येऊन नवरा-बायकोचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com