Gyanvapi mosque survey : 'ज्ञानवापी' प्रकरणी कोर्टाचे ३ मोठे आणि महत्वाचे निर्णय

वाराणसी जिल्हा न्यायालयानं कोर्ट कमिश्नर अजय कुमार मिश्रा यांना पदावरून हटवलं आहे.
Gyanvapi Masjid
Gyanvapi Masjidsaam tv

Gyanvapi mosque survey : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील (Gyanvapi Masjid) ज्ञानवापी मशिदीसंदर्भात वाराणसी जिल्हा न्यायालयानं आज, मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयानं (court) कोर्ट कमिश्नर अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांना पदावरून हटवलं आहे. या प्रकरणासंबंधी माहिती बाहेर उघड करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टानं ही बाब गांभीर्यानं घेऊन अजय कुमार मिश्रा यांना हटवलं आहे. स्पेशल कोर्ट कमिश्नर विशाल सिंह (Vishal singh) यांनी हा आरोप केला होता. आता उद्या सर्वेक्षणाच्या अहवालावर सुनावणी होणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

Gyanvapi Masjid
भारतानं पुन्हा पाकिस्तानचे कान पिळले; जम्मू-काश्मीर राग आळवल्यानं फटकारलं

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालाबाबत स्थानिक न्यायालयानं (court) निर्णय दिला आहे. हा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयानं दोन दिवसांचा अवधी दिला आहे. तर वाराणसी न्यायालयानं अजय कुमार मिश्रा यांना कमिश्नर पदावरून हटवलं आहे. उर्वरित दोन कमिश्नरना अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. कोर्टात सरकारी वकिलांनी आणखी एक याचिका दाखल केली आहे. त्यात सर्व्हेसाठी आणखी एका कोर्ट कमिश्नरांची मागणी केली आहे.

तसेच वजूखाना आणि स्वच्छतागृह इतर ठिकाणी हलवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. १४ ते १६ मे दरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात व्हिडिओग्राफी सर्व्हे करण्यात आला. १७ मे रोजी सर्व्हेशी संबंधित अहवाल कोर्टात सादर करावयाचा होता. मात्र, आता दोन दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. त्यानंतर हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या प्रकरणावर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. मुस्लिमांना नमाज पढण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मशिदीच्या परिसरात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर तेथील स्थान संरक्षित आणि सुरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. ते शिवलिंग सुरक्षित ठेवण्यात येईल, हे सुनिश्चित करण्यात यावे, असे कोर्टाने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com