Gyanvapi Case : काय आहे ज्ञानवापीत शिवलिंग की कारंजा ?; ३० मे रोजी येणार देशासमोर

वारणसी जिल्हा कोर्ट हे ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे व्हिडीओ आणि फोटो ३० मे रोजी प्रसिद्ध करणार आहे.
Gyanvapi Case
Gyanvapi CaseSaam Tv
Published On

वारणसी : ज्ञानवापी प्रकरणारून (Gyanvapi Case) हिंदू-मुस्लिम पक्षकार आमने-सामने आले आहेत. या प्रकरणावर देशातील लोक लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणातून अनेक नवेनवे खुलासे होत आहेत.त्यात वारणसी (Varanasi ) जिल्हा कोर्ट हे ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे व्हिडीओ ३० मे रोजी प्रसिद्ध करणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid ) आत नेमकं कारंजा आहे की शिवलिंग याचा उलगडाही ३० मे रोजी देशातील जनतेसमोर येणार आहे.कोर्ट याच दिवशी सर्वेक्षणाचा व्हिडीओ आणि फोटो लोकांसमोर आणणार आहे. ( Gyanvapi Case Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

ज्ञानवापी प्रकरणात या अंजुमन इंतजामियां मस्जिद समितीनं कोर्टात आणखी एक अर्ज सादर केला होता. या पत्रात त्यांनी ज्ञानवापी प्रकरणातील सर्व्हेक्षणाचा व्हिडीओ आणि फोटो हे सार्वजनिक करू नये,अशी मागणी केली होती. तसेच या प्रकरणात हिंदू पक्षकाराने कोर्टाकडे अहवाल आणि सर्व्हेक्षणाचा व्हिडीओ आणि फोटो सार्वजनिक डोमेनमध्ये आणण्यास आणि प्रकाशित करण्याला बंदी घाला, अशा आशयाचे पत्र दिलं होतं. या दोन्ही पक्षकारांच्या मागणीवर ३० मे रोजी वाराणसी जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीशाकडून निर्णय देण्यात येणार आहे.

काय आहे अहवालात नमूद ?

अहवालाच्या ७ क्रमांकाच्या पानावर महत्वाची बाबींचा उल्लेख आहे. यात वजू खाण्यात शिवलिंगासारखी आकृती असल्याचा उल्लेख आहे.या सर्व्हेक्षणातून अनेक वेगवेगळे खुलासे होणार आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान वकील कोर्टाच्या आयुक्ताने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला वजूखाण्यात पाठवले होते. तसेच पाण्यातील मासे सुरक्षित ठेवण्यासाठी मत्स विभागाच्या अधिकाऱ्याला बोलावण्यात आले होते. त्यावेळी मत्स विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, तलावत दोन फूट पाणी ठेवल्यानं मासे जिवंत राहू शकतात. त्यानंतर या तलावात दोन फूट पाणी ठेवण्यात आले. पाणी कमी केल्यामुळं काळ्या रंगाची गोलाकार दगडाची आकृती दिसून आली. त्याची उंची २.५ फूट असेल.

Gyanvapi Case
संभाजीराजे छत्रपतींनी मनाचा मोठेपणा दाखवला तो स्वागतार्ह : सुप्रिया सुळे

कारंजा आणि शिवलिंगावरून वाद

या दगडाच्या मध्यवर्ती भागात वर्तुळाकार आकाराचे छिद्र आहे. त्यात सिंक टाकल्यावर ६३ सेमी खोल गेला. या दगडाच्या आकाराचे संपूर्ण माप घेण्यात आले, त्यावेळी त्याचा व्यास सुमारे ४ फूट असल्याचे दिसून आले. या दगडाला हिंदू पक्षकार शिवलिंग संबोधत आहे. तर मुस्लिम पक्षकार त्याला कारंजे संबोधतात. सर्व्हेक्षण पथकानं याची पूर्ण फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी केली आहे. हे सर्व्हेक्षण आता सिलबंद करून न्यायालयात ठेवण्यात आले आहेत.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com