ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी होणार सोमवारी; आज काय झाले जाणून घ्या

आज वाराणसी कोर्टाने मुस्लिम पक्षकारांची बाजू ऐकली. आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
Gyanvapi Masjid Case Latest News
Gyanvapi Masjid Case Latest NewsSaam Tv

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणाची पुढील सुनावणी वाराणसी कोर्टात सोमवारी होणार आहे. आज या प्रकरणी सुनावणी झाली. आज मुस्लिम पक्षकारांनी बाजू मांडली. आजची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'आज मुस्लिम पक्षाने युक्तिवाद सुरू केला. आज हा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे, अशी माहिती विष्णू जैन यांनी दिली. (Gyanvapi Masjid Case)

आज मुस्लिम पक्षाने आमच्या याचिकेतील परिच्छेद वाचले आणि याचिका कायम ठेवण्यायोग्य नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही हस्तक्षेप केला आणि न्यायालयाला सांगितले की, आम्हाला विशेष अधिकार आहेत आणि सर्व युक्तिवाद देण्यात आले आहेत, असंही वकील विष्णु जैन म्हणाले.

Gyanvapi Masjid Case Latest News
ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात; लवकरच होणार सुनावणी

३०मे रोजी 'शिवलिंग' पूजेवर होणार सुनावणी

ज्ञानवापी (Gyanvapi Masjid) परिसरात सापडलेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका बुधवारी फास्टट्रॅक कोर्टात (Court) वर्ग करण्यात आली. या याचिकेवर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या कथित शिवलिंगाची नियमित पूजा करण्याचा अधिकार मागणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. ही सुनावणी ३० मे रोजी होणार आहे. (Gyanvapi Masjid Case Latest)

Gyanvapi Masjid Case Latest News
Sex Work In India: 'सेक्स वर्क'ला व्यवसाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विश्व वैदिक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांच्या वतीने दिवाणी न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात ज्ञानवापी परिसरात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालणे, परिसर हिंदूंना सोपवणे तसेच ज्ञानवापी येथे आढळलेल्या आदी विश्वेश्वर शिवलिंगाची नियमित पूजा करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com