Gurmeet Ram Rahim: बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीमला पॅरोल मंजूर

बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची पॅरोलवर तुरुंगातून सुटका होणार
Gurmeet Ram Rahim: बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीमला पॅरोल मंजूर
Gurmeet Ram Rahim: बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीमला पॅरोल मंजूरSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची (Gurmeet Ram Rahim Singh) पॅरोलवर (parole) तुरुंगातून सुटका होणार आहे. गुरमीत हरियाणात (Haryana) रोहतक तुरुंगात सध्या बंद आहे. पंजाब (Punjab) मधील निवडणुकीच्या (election) १३ दिवस अगोदर त्याची तुरुंगातून सुटका होत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावले आहेत. पंजाब मधील २३ जिल्ह्यांमध्ये (districts) ३०० मोठे डेरे आहेत. ज्यांचा राज्याच्या राजकारणावर (politics) मोठा प्रमाणात प्रभाव आहे. (Gurmeet Ram Rahim granted parole for sexual assualt)

हे देखील पहा-

यामुळेच राम रहिमची पॅरोल मंजूर झाल्याची चर्चा आहे. डेरा सच्चा सौदा हरियाणामधील सिरसा (Sirsa) जिल्ह्यातील आहे. पंजाब मधील मालवा (Malwa) भागात सुमारे ६९ जागांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हरियाणा तुरुंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या २१ दिवसांच्या रजेच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. रोहतक आयुक्तांच्या स्वाक्षरीवर त्याला तुरुंगाबाहेर आणले जाणार आहे.

Gurmeet Ram Rahim: बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीमला पॅरोल मंजूर
मोठी बातमी! Jalna: महिला व बाल रुग्णालयातून चक्क बाळाची चोरी

सिरसा डेरालाही राम रहीमला पॅरोल मिळाल्याची माहिती मिळाली आहे. तेथे उपस्थित भाविकांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. एक ताफा राम रहीमला घेण्याकरिता रोहतकच्या सुनारिया कारागृहाकडे रवाना करण्यात आला आहे. २ साध्वींवर बलात्कार आणि २ हत्या केल्याप्रकरणी राम रहीम सुनारी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २००७ पासून गुरमीत राम रहीमने राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली होती.

२००७, २०१२ आणि २०१७ पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये डेराचा मोठा प्रभाव दिसला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुका आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील डेरा प्रमुखाने पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे कौतुक केले होते. मतांच्या राजकारणाकरिता सर्व नेते डेराकडे जात असतात.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com