गुलाबनंतर आणखी एक चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र-गुजरातला IMDकडून अलर्ट!
गुलाबनंतर आणखी एक चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र-गुजरातला IMDकडून अलर्ट!Saam Tv

गुलाबनंतर आणखी एक चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र-गुजरातला IMDकडून अलर्ट!

भारतीय हवामानशास्त्र विभागनुसार, 30 सप्टेंबर रोजी हे चक्रीवादळ बनून महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवर त्याचा प्रभाव दाखवेल.
Published on

मुंबई : गुलाब' चक्रीवादळाचा Gulab Cyclone कहर अजून थांबलेला नाही तर नवीन चक्रीवादळ 'शाहीन' Shaheen Cyclone ने लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. हे वादळ विशेषतः महाराष्ट्र Maharashtra आणि गुजरातच्या किनारपट्टी Gujrat भागात राहणाऱ्या लोकांसाठी चिंतेचे कारण ठरणार आहे. कारण, 'शाहीन' नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात Arabian Sea तयार होणार असून महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव दिसून येणार आहे.

हे देखील पहा-

सध्या 'गुलाब' चक्रीवादळाने महाराष्ट्रात विनाश आणला आहे. 'गुलाब' वादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले आहे. हे छत्तीसगड Chattisgarah आणि ओडिशाच्या Odisha दक्षिणेकडील गेले आहे. या कमी दाबाच्या निर्माण झालेल्या क्षेत्रामुळे सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस ते अतिवृष्टी Heavy Rain होत आहे. फक्त मराठवाडा Marathwada भागाबद्दल माहिती समोर येत आहे की, येथे 10 लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक गुरे वाहून गेली आहेत, दुकाने वाहून गेली आहेत.

येत्या 48 तासांमध्ये 'गुलाब' चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येईल. कुठेतरी मुसळधार तर कुठे मुसळधार पाऊस पडेल. इतक्या विध्वंसानंतर आता 'शाहीन' वादळाच्या आगमनाच्या बातमीने आणखी काय विध्वंस होईल याची भीती निर्माण केली आहे.

गुलाबनंतर आणखी एक चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र-गुजरातला IMDकडून अलर्ट!
MPSC: पुढील परीक्षांच्या तारखा ठीक मात्र नियुक्त्यांचं काय? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल

'गुलाब' पेक्षा अधिक तीव्र वादळ, ओमानने 'शाहीन' हे नाव दिले;

भारतीय हवामान विभागाने (IMD) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही वादळ पुन्हा एकदा नव्या रूपात दिसणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

अरबी समुद्रात हे वादळ तयार होईल. या चक्रीवादळाला 'शाहीन' म्हटले जाईल. हे नाव ओमान देशाने दिले आहे. या वादळ तयार कसे होईल, दिशा, वेग इ, संदर्भात प्रत्येक छोट्या -मोठ्या गोष्टीवर तज्ञ लक्ष ठेवून असणार आहेत. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभाग ने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन चक्रीवादळ 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. तेथे येऊन हे वादळ एक नवीन आकारात बदलेल. हे चक्रीवादळ बनून महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवर त्याचा प्रभाव दाखवू शकते. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शाहीनचा महाराष्ट्र आणि गुजरातवर किती परिणाम होईल?

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, शाहीन नावाचे हे नवीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर South Border Of India धडकणार नाही. हे 1 ऑक्टोबर रोजी ओमानच्या दिशेने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून दूर जाईल. परंतु यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल. म्हणजेच पावसाचा जोर काही दिवस कायम राहणार आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com