Gujrat Election 2022: रवींद्र जडेजाला आली बाळासाहेबांची आठवण! VIDEO ट्वीट करत म्हटलं...

जडेजाची पत्नी रिवाबा जामनगरमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहेत.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaSaam Tv
Published On

Gujrat Election 2022: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुजरात निवडणुकीत पत्नीच्या प्रचारात व्यस्त आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगरमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान त्याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टद्वारे त्याने 'गुजरातींना' सल्लाही दिला आहे.

जडेजाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ बाळासाहेबांचा जुन्या कार्यक्रमातील आहे. त्यात ते ‘नरेंद्र मोदी गेले तर गुजरात गेला. नरेंद्र मोदींना तुम्हा बाजूला केलं गुजरात गेला’ असं बाळासाहेब बोलताना दिसत आहेत. यासोबतच जडेजाने पोस्टमध्ये लिहिले की, 'गुजरातींनो, समजून घ्यायला अजून वेळ आहे.'

रिवाबा यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे जडेजाची बहीण नयनाबा काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांचे वडीलही काँग्रेसचा प्रचार करत आहेत. निवडणुकीपूर्वीच रिवाबा यांनी आपल्या कुटुंबात कोणतेही मतभेद नसून केवळ विचारधारेचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले होते. 2012 मध्ये भाजपने धर्मेंद्रसिंह जडेजा यांना येथून उमेदवारी दिली होती.

गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात गुरुवारी सकाळी 8 वाजता मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीत 27 वर्षांपासून राज्यात सत्ता गाजवणाऱ्या भाजपसमोर आपले सरकार टिकवण्याचे आव्हान आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला बदलासाठी मतदारांनी मतदान करावे, अशी अपेक्षा आहे. गुजरातच्या राजकीय क्षेत्रात यावेळी आम आदमी पक् देखील विजयाचा दावा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com