Gujarat Road Accident : टायर फुटला, अनियंत्रित जीप थेट ट्रकमध्ये घुसली; भीषण अपघातात ७ जणांनी गमावला जीव

Gujarat Accident News : गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात झाला. त्यात सात जणांनी जीव गमावला.
Gujarat Accident News
Gujarat Accident NewsANI

Gujarat Accident News : गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात झाला. भरधाव जीपचा टायर फुटल्यानं अनियंत्रित होऊन ती समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जोरानं धडकली. या अपघातात चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत.

पाटण (Patan) जिल्ह्यात वाराहीजवळ बुधवारी दुपारी हा भीषण अपघात (Accident) झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले. त्यांनी जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेले. दुसरीकडे, या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. (Breaking News)

Gujarat Accident News
Accident News: मोठी बातमी! नाशिकमध्ये भीषण अपघात, आयशरने गाड्यांना उडवले

याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात राधनपूरजवळ झाला. एक जीप १५ प्रवाशांना घेऊन जात असताना, जीपचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटलं. मिळालेल्या माहितीनुसार, ही जीप वाराही गावाकडे जात होती.

भरधाव जीप अनियंत्रित झाल्यानंतर समोर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

Gujarat Accident News
Pune Accident News : पुण्यातील वडगाव पुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकनं १० ते १२ वाहनांना उडवलं

या अपघातात इतर सात ते आठ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलेही आहेत. जखमी झालेल्यांना राधनपूर आणि पाटण येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या घटनेत दोषी आढळल्यास दोन्ही वाहनांच्या चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com