Hardik Patel: हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार? 'या' कारणामुळं जोरदार चर्चा

काँग्रेस नेते हार्दिक पटेल पक्षश्रेष्ठींवर नाराज असून, ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.
Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates
Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updatesSaam TV
Published On

अहमदाबाद: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुकीत पंजाब सोडला तर, उर्वरित राज्यांत भाजपने सत्ता मिळवली. आता यावर्षी गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपसह आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरूवात केली असली, तरी कॉंग्रेसमध्ये मात्र अद्यापही वेगवान हालचाली दिसून येत नाही. अशातच काँग्रेसचे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates
ब्रिटनचे PM बोरिस जॉन्सन म्हणाले, मला अमिताभ बच्चन झाल्यासारखं वाटतंय!

हार्दिक पटेल पक्षश्रेष्ठींवर नाराज?

हार्दिक पटेल यांनी नुकतीच हायकमांडची भेट घेतली. यावेळी त्यांनी के.सी वेणुगोपाल यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. हार्दिक पटेल यांचं म्हणणं आहे की, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्यासोबत जे काही घडलं, त्याच स्क्रिप्टची गुजरातमध्येही पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी राम मंदिर आणि कलम ३७० या मुद्द्यांवरून भाजपचं कौतुक देखील केलं.

भाजपसह पक्षनेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव

यावेळी हार्दिक पटेल यांना तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का? असा प्रश्व विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अतिशय सावध उत्तर दिलं. हार्दिक पटेल म्हणाले की, "सध्या मी २८ वर्षांचा आहे, माझ्याकडे अजून ४० वर्षे आहेत. भविष्यात मी जेव्हाही निवडून येईन, तेव्हा गुजरातचा विकास हेच माझे ध्येय असेल. भाजपच्या नेतृत्वात निर्णय घेण्याची क्षमता आहे. मी त्यांच्या चांगल्या मुद्द्यांशी सहमत आहे. भाजपने काश्मीरमधून कलम ३७० हटवले. अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे. भाजपचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. कोणी चांगले काम करत असेल तर, त्याचे कौतुक केले पाहिजे".

Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates
दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 मेपर्यंत वाढ

भाजपकडूनही हार्दिक पटेल यांचं कौतुक

हार्दिक पटेल यांनी स्वत:ला 'रामभक्त' संबोधून आपण हिंदू असल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं. त्यानंतर गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी हार्दिक पटेल यांचं कौतुक केलं. पाटील म्हणाले की, संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्हिजन'च्या पाठिशी असून लोक भाजपच्या विचारधारेने प्रभावित आहेत. २०१४ पासून मोदी देशसेवेच्या कामात व्यग्र आहेत. अनेक जण त्यांच्यापासून प्रेरित झाले आहेत. हार्दिक पटेल यांनी आपले मत जनतेसमोर मांडले ही चांगली गोष्ट आहे. असे बरेच लोक आहेत, ते याबाबत उघडपणे बोलत नाहीत".

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com