'Valentine day'च्या दिवशी लग्न, नवरदेव घोड्यावर बसताच कोसळला; हार्ट अटॅकने मृत्यू

Heart Attack News : लग्नात घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला अचानक चक्कर आली. प्रकृती बरी नसल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली.
Heart Attack viral video
Heart Attack viral videoSaam Tv
Published On

Heart Attack :सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण घोड्यावर बसून असल्याचे पाहायला मिळते. अचानक त्याला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. या व्हिडीओमधल्या तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे म्हटले जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशमधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या श्योपूर शहरामध्ये ही घटना घडली आहे. श्योपूर शहरातील पाली रोडवरील जाट हॉटेलमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मुहूर्ताच्या वेळी वरातीसह नवरदेव घोड्यावर बसून आला. घोडा मंडपामध्ये शिरल्यानंतर वराती नाचू लागले. त्याच दरम्यान नवऱ्याला चक्कर आली.

चक्कर आल्यानंतर नवऱ्याला वरातीतल्या लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला पुन्हा घोड्यावर बसवले. पण प्रकृती बिघडल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घोड्यावरच हृदयविकाराचा झटका आल्याचे तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

Heart Attack viral video
Viral Video : काळी मांजर आडवी गेली अन् पाकिस्तानने खेळच थांबवला, मैदानात नेमकं काय झालं? पाहा VIDEO

मृत तरुणाचे नाव प्रदीप जाट असे आहे. तो एनएसयूआयचा माजी जिल्हा अध्यक्ष होता. व्हेलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करण्याचे त्याने आणि त्याच्या भावी पत्नीने ठरवले होते. पण लग्न लागण्यापूर्वीच काळाने घाला घातला. वरातीच्या घोड्यावरच प्रदीपला हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Heart Attack viral video
Valentine मध्ये दिला गुलीगत धोका; नवऱ्याला सोडलं, बॉयफ्रेंडसोबत ठोकली धूम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com