India-Greece : भारत-ग्रीसमध्ये नव्या मैत्रीची मजबूत 'कनेक्टिव्हिटी'; जाणून घ्या दोन्ही देशात कोणत्या विषयांवर झाले करार

Greece Pm Visit India : आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्यात चर्चा झाली. दोन्ह नेत्यांच्या भेटीदरम्यान भारत आणि ग्रीस यांच्यात व्यापार, कृषी, फार्मा, वैद्यकीय, अंतराळ आणि संरक्षण या विषयांवर करार झाले आहेत.
Greece Pm Visit India
Greece Pm Visit IndiaANI

Prime Minister of Greece Kyriakos Mitsotakis :

भारत आणि ग्रीसमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस दोन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान यांच्यात आज दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी किरियाकोस मित्सोटाकिस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. आज दोन्ही देशात व्यापार, कृषी, फार्मा, वैद्यकीय, अंतराळ आणि संरक्षण या विषयांवर करार झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. (Latest News)

आज ग्रीसच्या पंतप्रधानांचे राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर भारत-ग्रीस संबंधांबाबत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मित्सोटाकिस यांच्यात चर्चा झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोदींनी ग्रीसला भेट दिली होती. त्यावेळी भारत-ग्रीस संबंध पुढे नेण्यासाठी चर्चा झाली होती. आज पंतप्रधान मित्सोटाकिस यांच्या भेटीदरम्यान भारत आणि ग्रीस यांच्यात व्यापार, कृषी, फार्मा, वैद्यकीय, अंतराळ आणि संरक्षण या विषयांवर करार झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत आणि ग्रीस यांच्यातील मजबूत कनेक्टिव्हिटीच्या व्यापक संदर्भात चर्चा झाली. ही कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा विचार या चर्चेत करण्यात आला. याशिवाय भारत-मध्य-पूर्व युरोप कॉरिडॉरशी कनेक्टिव्हिटीचा एक भाग असलेल्या बंदरांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यावरही दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

भूमध्यसागरीय तसेच इंडो पॅसिफिकमध्ये भागीदारी निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉरच्या संदर्भात सहकार्य कसे वाढवता येईल यावरही चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Greece Pm Visit India
PM Modi Cabinet Decision : ऊस एफआरपी ते अंतराळ क्षेत्रात एफडीआय.... मोदी मंत्रिमंडळाचे ५ महत्वाचे निर्णय वाचा !

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com