Gold Silver Rate Today : तुम्ही जर स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, ऐन लगीनसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात १३६ रुपयांची घसरण नोंदवली गेली. विशेष बाब म्हणजे मंगळवारी (२९ नोव्हेंबर) सुद्धा सोन्याचे भाव १०१ रुपयांनी कमी झाले होते. (Gold Silver Price Today)
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Gold Silver) घसरण झाली आहे. बुधवारी चांदीचा भाव प्रतिकिलो ५२० रुपयांनी कमी झाला आहे. भारता सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी सराफा बाजारात सोन्याचा भावात १३६ रुपयांची घसरण झाल्याने २४ कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा भाव (Gold Price) प्रतितोळा ५२ हजार ८३७ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ४८ हजार २८७ इतका आहे.
बुधवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सराफा बाजार खुलताच चांदीचे दर (Silver Price) तब्बल ५२० रुपयांनी कमी झाले. सध्या भारतीय सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर ६१ हजार २९५ इतका झाला आहे. येत्या काही दिवसांत चांदीचा भाव प्रतिकिलो ६५ हजारांवर पोहचेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७५३.२५ डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीची किंमतही प्रति औंस २१.२३ डॉलरवर आली. एचडीएफसी सिक्युरिटीजमधील संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, कोमॅक्स गोल्डमध्येही घसरण झाली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.