Gold Silver Price : दिलासादायक! सोने खरेदी करण्याचा 'गोल्डन चान्स'; सोनं झालं इतक्या रुपयांनी स्वस्त

आज सोनं आणि चांदीचा भाव काय आहे?
Gold-Silver Price
Gold-Silver Price Saam TV

Gold Silver Price Today :  तुम्ही जर सोनं (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आज भारतीय सराफा बाजारात 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदी देखील स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव 0.31 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, वायदा बाजारात आज चांदी (Silver) 0.41 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा दर 0.45 टक्क्यांनी वाढला होता आणि चांदीचा दर 1.59 टक्क्यांनी वधारला होता.

Gold-Silver Price
Shri Sammed Shikharji : सरकारच्या 'या' निर्णयावर जैन समाज उतरला रस्त्यावर

आजचा सोन्याचा भाव काय?

सोमवारी सकाळी, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने वायदा बाजारात 54,125 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते, कालच्या तुलनेत आज 170 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. आज सोन्याचा भाव 54,109 रुपये इतका आहे.

आजचा चांदीचा भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात घसरण झाली. कालच्या तुलनेत आज चांदीचा भाव 277 रुपयांनी घसरून 67,761 रुपयांवर व्यवहार करत होता. चांदीचा दर आज 67,490 रुपयांवर आहे. 

Gold-Silver Price
Pune Cat News: लाडक्या मांजराच्या मृत्यूमुळे डॉक्टरांना ६ जणांकडून जबर मारहाण; रुग्णालयही फोडलं

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर मिळवा

सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या फोनवर मेसेज येईल. त्यात तुम्ही सोन्या चांदीचे अधिकतम दर मिळवू शकता.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com