Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीचा भाव वधारला; जाणून घ्या आजचा दर

सोन्याचे दर घसरले असले, तरी चांदीच्या दरात मात्र तेजी दिसून आली.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam TV

Gold Silver Price Today : तुम्ही जर स्वस्तात सोनं (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दरात घसरण झालीये. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही झाला आहे. मंगळवारी सकाळी भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहे. सोन्याचे दर घसरले असले, तरी चांदीच्या (Silver) दरात मात्र तेजी दिसून आली. (Gold Silver Latest Price Today In India)

Gold Silver Price
Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मंगळवारी सकाळी सराफा बाजारात खुलताच सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा भाव 80 रुपयांनी घसरून प्रतितोळा 49 हजार 300 रुपयांवर पोहचला आहे.

एकीकडे सोन्याचा भाव घसरला असला, तरी चांदीच्या भावात मात्र तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीच्या दरात वाढ झाली. मंगळवारी चांदीचा दर 402 रुपयांनी वाढून प्रति किलो 57,086 रुपये इतका झाला. आज चांदीचा व्यवहार 57,002 रुपयांपासून सुरू झाला. काही वेळातच चांदीचा भाव 57,125 रुपयांवर पोहचला. (Gold And Silver Price Today)

Gold Silver Price
Nashik News : पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून; धक्कादायक VIDEO समोर

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव घसरला

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. आज सोन्याच्या स्पॉट किमतीत 0.11 टक्‍क्‍यांनी घसरण झाली तर चांदीची किंमतही 0.47 टक्‍क्‍यांनी घसरली. सोन्याची स्पॉट किंमत आज 1,676.82 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचप्रमाणे, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतही घसरून 19.54 डॉलर प्रति औंस झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव

चेन्नई - 50,020 रुपये

दिल्ली - 49,300 रुपये

हैदराबाद - 49,640 रुपये

कोलकत्ता - 49,910 रुपये

लखनऊ - 49,300 रुपये

मुंबई - 50,020 रुपये

नागपूर - 49,300 रुपये

पुणे - 50,050 रुपये

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com