Nashik News : पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून; धक्कादायक VIDEO समोर

अकरावीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुराच्या वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.
Nashik Collage Girl Flood Water Viral Video
Nashik Collage Girl Flood Water Viral VideoSaam TV

तरबेज शेख, साम टिव्ही

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यासह निफाड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. याच पुराच्या एक महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुराच्या वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. (Nashik Collage Girl Was Swept Away In Flood Water)

Nashik Collage Girl Flood Water Viral Video
Funny Video : उंदराला पाहून मांजराला घामच फुटला, ठोकली धूम; VIDEO पाहून पोट धरून हसाल

निफाड येथील मुळ रहिवासी असणारी तन्वी विजय गायकवाड (वय १७) हिचे वडील विजय गायकवाड काकासाहेब नगर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात. आपल्या वडीलांच्या शाळेत आपण महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे म्हणून ती जवळच असलेल्या शिवडी ता. निफाड येथील बापू क्षीरसागर व शंकर क्षीरसागर येथे मामाकडे राहुन स्कुटीवरुन ये-जा करत महाविद्यालयिन शिक्षण घेत होती.

दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आला होता. सोमवारी सकाळी ७ वाजता उगाव- खेडे या दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी सुरु होते. पुरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वीने आपली बँटरीवरील स्कुटी पाण्यात घातली अन् तिथेच घात झाला. (Nashik Collage Girl Flood Water Viral Video)

पुराच्या पाण्यात स्कुटी टाकताच, तन्वी वाहून गेली. परिसरातील नागरिकांनी तिला वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नागरिकांनी तन्वीचा शोध घेतला. तिचा मृतदेह नदीप्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com