Gold Price : सोनं लग्नाचं बजेट बिघडवणार? आठवडभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ

Gold Price: 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या व्यावसायिक आठवड्यात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 729 रुपयांनी वाढल्या आहेत.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodaySaam TV
Published On

Gold Price : सोन्यातील गुंतवणूक अतिशय फायदेशीर आणि सुरक्षित मानली जाते. आजही लोकांना सोने खरेदी करायला आवडते. तुम्हीही सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल सध्याचे सोन्याचे दर तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. संपूर्ण आठवडाभरातील भारतीय सराफा बाजाराच्या स्थितीबद्दल माहिती घेऊया.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या अधिकृत वेबसाइटनुसार, 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या व्यावसायिक आठवड्यात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 729 रुपयांनी वाढल्या आहेत. व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,078 रुपये होता. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तो 57,788 रुपयांवर होता. (Latest Marathi News)

Gold Silver Price Today
Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे...; कसबा-चिंचवड निवडणुकीच्या लढाईत ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं गजब वक्तव्य

चांदीची किंमत सोमवारी 68,149 रुपये होती, जी वाढून 69,539 रुपये झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 1,390 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी दुकानात जाल तेव्हा त्याच्या किमतीत काहीसा फरक असेल.

Gold Silver Price Today
Marriage : लग्नानंतर पहिल्यांदाच नवऱ्याने नवरीचा पाहिला चेहला, अन् म्हणाला 'मी आत्महत्या करेन...'

आठवडाभरात सोन्याचे दर कसे वाढले

>> 30 जानेवारी - 57,079 रुपये/तोळे

>> 31 जानेवारी - 56,865 रुपये/तोळे

>> 01 फेब्रुवारी - 57,910 रुपये/तोळे

>> 02 फेब्रुवारी - 58,882 रुपये/तोळे

>> 03 फेब्रुवारी - 57,788 रुपये/तोळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com