डेल्टा व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सील

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केरी सत्तरी येथील चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला.
डेल्टा व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सील
डेल्टा व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सीलSaam Tv
Published On

अनिल पाटील

गोवा - महाराष्ट्रात Maharashtra डेल्टा प्लस Delta Plus विषाणूचे रुग्ण मिळाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून  डेल्टा प्लस विषाणूची  लागण झालेले रुग्ण गोव्यात Goa येऊ नये म्हणून गोव्यातील सीमा मार्गावर कडक तपासणी सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pramod Sawant यांनी केरी सत्तरी येथील चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला. Goa border seal against the backdrop of Delta variant

हे देखील पहा -

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, डेल्टा प्लसची प्रकरणे शेजारील राज्यात वाढत चालल्याने त्याचा प्रसार गोव्यात होऊ नये म्हणून गोवा सरकारने आपल्या सर्व चेक नाक्यावर कडक तपासणी सुरू केली. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कोविड नेगेटिव्ह  निगेटिव्ह असेल याकडे सरकार सतर्क आहे . त्यासाठी सर्व चेक नाक्यावर कोविड तपासणी केंद्र उभारली असून या केंद्रामार्फत कोरोनाची चाचणी केली जात आहे. गोव्याच्या जनतेच्या काळजीच्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

डेल्टा व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सील
महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाण

केरी बरोबरच शिरोडा, पत्रादेवी, दोडामार्ग या चेक पोस्टवर तात्पुरत्या स्वरूपाचे लॅबरोटरी सुरू करण्यात आल्या असून कोरोना टेस्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. नागरिकांकडे कोविडचा नकारात्मक अहवाल असणे गरजेचे आहे अहवाल नसल्यास खाजगी संस्थांनी सुरु केलेल्या केंद्रात रॅपिड अँटीजन चाचणी करून नकारात्मक अहवाल सादर केल्यास प्रवेश दिला जाणार आहे. तर कोविड पॉझिटिव्ह असलेल्या लोकांसाठी गोव्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com