महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाण

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवक व इतर दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाण
महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाणदिनू गावित
Published On

दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकित वीज बिल वसुलीसाठी खेतिया रोडवरील भारत डेअरीवर गेले असता त्यांना नगरसेवक व इतर दोघांकडून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवक व इतर दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महावितरण कंपनीच्या कृतिसमितीने एकत्रित येत कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाला व इतर दोघांना अटक करण्याची मागणी करुन महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. MSEDCL employees beaten by the corporator

हे देखील पहा -

शहादा शहरातील गरीब नवाज काॅलनीतील भारत डेअरी यांचे चार महिन्याचे कमर्शियल वीज बिल वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे कर्मचारी गेले असता विज बिल भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अखेर डेअरीचे वीज कनेक्शन कट केले. त्याचा राग आल्यामुळे मी वीज बिल भरण्यास तयार आहे व डेअरी वर येऊन त्वरित वीज कनेक्शन जोडणी करा अन्यथा डेअरीतील पदार्थ खराब होतील, असे सांगून कर्मचाऱ्यांना बोलवून नगरसेवक वाहिद रशिद पिंजारी, मन्नान रशिद पिंजारी आणि वसीम अख्तर शेख तेली यांनी वीज वितरण कंपनीच्या गणेश साळी व सुनिल ठाकरे या कर्मचार्यांना बेदम मारहाण केली.

महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाण
धुळ्यात १६ लाखांहून अधिकचा गुटखा व पानमसाला जप्त

म्हणून संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर एकत्रित येत घोषणाबाजी करत महावितरणचा निषेध केला व वरिष्ठांपुढे  होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. जर जबाबदार नागरिकच शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले चढवत असतील तर वीज वितरण कंपनीने केवळ गोरगरिबांचे कनेक्शन कट करावे का ?त्यांच्याकडूनच थकित बिल वसुली करावी का ?धनदांडग्यांना मात्र यातून सूट मिळेल का? राजकीय दबावाखाली महावितरणने पैसे वसुली करूच नये का ?असे अनेक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.एन.सोनाट, कार्यकारी अभियंता संदेश ठवरे, उपकार्यकारी अभियंता भुषण जगताप, सहायक अभियंता सुजित पाटील, तिरूपती पाटील, विजय लांडगे, मनीष पवार, गुलाब सोनवणे, तुषार ठाकूर आदि उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com