Ghulam Nabi Azad: पंतप्रधान मोदींनी कधीच सूड उगवला नाही, गुलाम नबी आझादांकडून कौतुक; काँग्रेसच्या उणिवा मोजल्या

Ghulam Nabi Azad Criticized Congress : या आत्मचरित्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना उदारमतवादी म्हटले आहे.
Ghulam Nabi Azad praises PM Modi
Ghulam Nabi Azad praises PM ModiSAAM TV

Ghulam Nabi Azad praises PM Modi: काँग्रेसमध्ये अनेक वर्ष राजकीय कारकिर्द गाजवल्यानंतर बंडखोरीकरून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या राजकीय वाट निवडलेल्या नवाब यांनी केलेल्या खुलाशांमुळे आता वेगळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आझाद यांच्या आत्मचरित्रात मोदींचं कौतुक

माजी राज्यसभा खासदार आणि डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्र 'आझाद' बुधवारी दिल्लीत प्रदर्शित होत आहे. या आत्मचरित्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना उदारमतवादी म्हटले आहे.

त्यांनी लिहिले की, "मी त्यांची अनेक विधेयके पूर्णपणे अयशस्वी ठरवले, परंतु त्यांना श्रेय दिले पाहिजे की त्यांनी राजकारण्यासारखा व्यवहार ठेवला, बदला घेतला नाही." तसेच काँग्रेसचे जी-23 नेते भाजपच्या जवळ असल्याचा आरोप आझाद यांनी फेटाळून लावले.

Ghulam Nabi Azad praises PM Modi
Devendra Fadnavis News : मी फडतूस नाही तर काडतूस, झुकेगा नही तो घुसेगा; फडणवीस ठाकरेंवर तुटूनच पडले

या आत्मचरित्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे की, जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 हटवण्याची घोषणा केली आणि जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा विरोधी पक्षांचे नेते धरणे धरून बसले. पण या निदर्शनात जयराम रमेश उपस्थित नव्हते.

पण जयराम रमेश आले नाहीत.....

या दिवसाच्या घटनेचा संदर्भ देत गुलाम नबी आझाद त्यांच्या आत्मचरित्राच्या पृष्ठ क्रमांक 251 वर लिहिले "ज्या क्षणी गृहमंत्र्यांनी घटनेतील कलम 370 रद्द करण्याच्या आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या केंद्राच्या हालचालीची घोषणा केली. मी माझे इअरफोन काढले आणि थेट सभागृहाच्या वेलमध्ये गेलो.

मी संपूर्ण विरोधकांना धरणे धरायला बोलावले. मी काँग्रेस पक्षाच्या लोकांनाही असेच आवाहन केले. सर्वजण विरोध करायला आले पण जयराम रमेश आले नाहीत, ते तिथेट बसले आणि परंतु विरोध करायला आले नाही." 5 ऑगस्ट 2019 रोजी अमित शहा यांनी कलम 370 रद्द करण्याची घोषणा केली तेव्हा गुलाम नबी आझाद राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. (Latest Political News)

Ghulam Nabi Azad praises PM Modi
Maharashtra Politics: पगार किती, बोलता किती? गोमूत्राचे टँकर मागवून ठेवा... अंबादास दानवेंचा बावनकुळेंवर पलटवार

सलमान खुर्शीद यांच्याबाबातही नाराजी

गुलाम नबी आझाद यांच्या पुस्तकात केवळ जयराम रमेश यांच्याबद्दलच नाही, तर सलमान खुर्शीद यांच्याबाबातही नाराजीचा उल्लेख आहे. सलमान खुर्शीद यांनीच काँग्रेस असंतुष्टांच्या G-23 गटात आझाद यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या आत्मचरित्रातील एका प्रकरणात आझाद लिहितात, "आज मी त्यांना सांगू इच्छितो की आमच्यापैकी काहींनी आम्हाला जे काही मिळाले त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेळ दिला, इतर अनेकांनी अवाजवी फायदा घेतला. त्यांनी ट्वीटद्वारे त्यांची उपस्थिती दाखवल्याशिवाय पक्षासाठी काहीही केले नाही." (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com