Gangster Tillu Tajpuriya: तिहार जेलमध्ये गॅंगवॉर; कुप्रसिद्ध गँगस्टर टिल्लूची हत्या, लोखंडी रॉडने केला हल्ला

Delhi News: तिहार तुरुंगात १९ दिवसांतील हे दुसरे गॅंगवॉर आहे.
Gangster Tillu Tajpuriya
Gangster Tillu TajpuriyaSaam Tv
Published On

Gangster Tillu Tajpuriya Murder: देशातील उच्च सुरक्षा कारागृह मानल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात पुन्हा एकदा गॅंगवॉर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या गॅंगवॉरमध्ये गँगस्टर टिल्लू हत्या करण्यात आली आहे. तिहार तुरुंगात १९ दिवसांतील हे दुसरे गॅंगवॉर आहे. (Latest Marathi News)

लोखंडी रॉडने हल्ला

यापूर्वी 14 एप्रिल रोजी दिल्लीतील गँगस्टर प्रिन्स तेवतियाची हत्या झाली होती. आज 2 मे रोजी योगेश टुंडा आणि त्याचा साथीदार दीपक तेतर यांनी टिल्लूवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात टिल्लूचा मृत्यू झाला. 

Gangster Tillu Tajpuriya
Arun Gandhi Passed Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डॉक्टरांनी केलं मृत घोषित

हल्ला केल्यानंतर टिल्लूला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोहिणी कोर्ट गोळीबार प्रकरणातील टिल्लू हा मुख्य सूत्रधार होता. रोहिणी कोर्ट गोळीबारात गँगस्टर जितेंद्र गोगी मारला गेला.

कारागृहात चौघांनी केला हल्ला

33 वर्षीय टिल्लू ताजपुरियाला तिहार तुरुंगातील हाय रिस्क वॉर्डच्या तळमजल्यावर ठेवण्यात आले होते. सकाळी 6.15 च्या सुमारास तुरुंगात असलेल्या दीपक उर्फ ​​तीतर, योगेश उर्फ ​​टुंडा, राजेंद्र आणि रियाझ खान या चार जणांनी टिल्लूवर लोखंडी रॉडने हल्ला केला. टिल्लूला गंभीर अवस्थेत दिल्लीतील (Delhi) दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपासात गुंतले आहेत.

जितेंद्र गोगीची हत्या

दिल्लीतील गँगस्टर जितेंद्र ​​गोगी याची 24 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीच्या रोहिणी कोर्टात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुनील उर्फ ​​टिल्लू ताजपुरियाचे नाव समोर आले होते. जितेंद्र उर्फ ​​गोगी रोहिणी कोर्ट क्रमांक 207 मध्ये दाखल होताच हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी त्याच्या पाठीला लागली. गोळी लागताच त्याने मागे वळून हल्लेखोरांकडे पाहिले, तेव्हा त्याच्या छातीत दुसरी गोळी लागली.

टिल्लू हा दिल्ली आणि हरियाणातून टोळी चालवत होता

​​टिल्लू ताजपुरिया हा दिल्लीतील अलीपूरजवळील ताजपूर गावचा रहिवासी होता. हा कुख्यात गुंड आपली टोळी दिल्ली आणि हरियाणातून चालवत असे. टिल्लूने दिल्लीच्या मंडोली कारागृहात बसून गुंड जितेंद्र गोगीची हत्या केली होती. त्याने आपल्या शूटरला रोहिणी कोर्टात पाठवून ही हत्या घडवून आणली. मात्र, दोन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली. मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी टिल्लूने गुंड जितेंद्र गोगीची हत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com