Ranjit Savarkar : 'नथुराम गोडसेने पिस्तुलातील झाडलेल्या गोळीनं गांधींचा खून झाला नाही', रणजीत सावरकरांचा दावा

Make Sure Gandhi is Dead Book: विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांचं नवं पुस्तक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. 'मेक शुअर गांधी इज डेड' (Make Sure Gandhi is Dead), असं या पुस्तकाचे नाव आहे.
Gandhi was not killed by Nathuram Godse Ranjit Savarkar claimed in his book Make Sure Gandhi is Dead
Gandhi was not killed by Nathuram Godse Ranjit Savarkar claimed in his book Make Sure Gandhi is DeadSaam Tv
Published On

>> प्रमाद जगताप

Gandhi was not killed by Nathuram Godse Ranjit Savarkar claimed in his book Make Sure Gandhi is Dead:

विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांचं नवं पुस्तक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. 'मेक शुअर गांधी इज डेड' (Make Sure Gandhi is Dead), असं या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात सावरकर यांनी नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळी चालवली नाही, असा वादग्रस्त दावा केला आहे.

''महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसे याने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने गांधी यांचा मृत्यू झाला, ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलीच नव्हती'', असा दावा या पुस्तकात रणजित सावरकर यांनी केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gandhi was not killed by Nathuram Godse Ranjit Savarkar claimed in his book Make Sure Gandhi is Dead
Uddhav Thackeray: पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या नेमणुकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले, 'लोकशाही...'

रणजित सावरकर यांनी दावा केला आहे की, ''नथुराम गोडसे फक्त आरएसएसचे स्वयंसेवक होते, म्हणून आरएसएसआणि हिंदू महासभेवर बंदी घेण्यात आली होती. हे रामाचे नाव घेऊन मोठं पाप दाबून ठेवलं होतं, ते या पुस्तकातून समोर येईल.'' (Latest Marathi News)

रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हंटलं आहे की, ''७६ वर्षांपूर्वी अशी घटना घडली ज्यामुळ जगाचं राजकारण बदललं. त्याचा दाग सावरकर यांच्यावर लावला गेला. मी कपूर कमीशनचा अभ्यास सुरू केला. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारलाही नाही. नथुराम गोडसे यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं नाही. नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळीने गांधी यांचा खून झाला नाही. पिस्तुलातून गोळीचा आकार वेगळा आहे. मी या सगळ्याचा अभ्यास केला. २ फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता.''

Gandhi was not killed by Nathuram Godse Ranjit Savarkar claimed in his book Make Sure Gandhi is Dead
Pune Crime: १० वर्षाच्या प्रेमाचा क्रूर अंत! IT इंजिनिअर तरुणीची 'OYO'मध्ये हत्या; भयंकर घटनेचं लखनौ ते पुणे कनेक्शन

ते पुढे म्हणाले आहेत की, ''फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबार आधारित आहे. त्याचा फोटो जोडला आहे. पंचनामे खोटे बनवण्यात आले, हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पोलिसांनी तपास नीट केला नाही. नथुराम गोडसे गांधी यांना मारायला आले होते, हे १०० टक्के खरं आहे. त्यांनी गोळ्या मारल्या हेही १०० टक्के खरं आहे. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com