Delhi Airport News: दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) शनिवारी संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दुबईला जाणाऱ्या FedEx विमानाने उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याला धडक दिली. ज्यानंतर तात्काळ दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. विमानतळ अधिकाऱ्यांनी ही महत्वाची माहिती दिली. या घटनेनंतर अग्निशमन दल आदींना पाचारण करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली विमानतळावरुन FedEx विमानाने उड्डाण घेतल्यानंतर एका पक्ष्याला धडकले. त्यामुळे त्याचे तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अशा परिस्थितीत विमानतळ प्रशासनाने संपूर्ण आणीबाणी (Emergency) जाहीर केली, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीला तोंड देता येईल. संपूर्ण आणीबाणीची घोषणा फक्त शनिवारी सकाळी 10 ते 11 पर्यंत होती. सध्या दिल्ली विमानतळावरील परिस्थिती सामान्य आहे.
दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, विमानाला पक्षाची धडक ही सामान्य गोष्ट नाही. यामुळे मोठ्या तांत्रिक बाबी उद्भवू शकतात, ज्यामुळे अनेकदा दुर्घटना घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जातात. त्यामुळेच खबरदारी घेणे गरजेचे असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.