
ftii recruitment 2023 recruitment for 84 posts in ftii candidates apply like this pvm91
Film And Television Institute Of India: सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे म्हणजेच एफटीआयआयमध्ये (FTII) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. ते एफटीआयआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकतात. एफटीआयआयमध्ये 84 जागांच्या भरतीसाठी (FTII Recruitment 2023) अधिकृत अधिसुचना जारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अनेक पदांवर भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत गट ब आणि क श्रेणीतील 84 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरु झाली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीशी संबंधित सर्व आवश्यक तपशील येथे दिले आहेत.
या भरती प्रक्रियेअंतर्गत कॅमेरामन, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस्ट, असिस्टंट मॅनेजमेंट, इंजिनियर, अप्पर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिंग मल्टी टास्किंग स्टाफ, ड्रायव्हर ही विविध रिक्त पदं भरली जाणार आहे.
महत्वाच्या तारखा -
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख - 29 एप्रिल 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 29 मे 2023
पात्रता -
या भरती प्रक्रियेसाठी फक्त भारतीय नागरिक असलेले उमेदवारच अर्ज करु शकतात. यासोबतच त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पात्र घोषित केलेले असावे. दिव्यांग श्रेणीअंतर्गत येणारे उमेदवार FTII मध्ये गट B आणि C श्रेणीच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा -
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असणे आवश्यक आहे. OBC, EWS, SC आणि ST या राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या संस्थेतील उमेदवारांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया -
FTII मधील गट B आणि C पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.
अर्ज फी -
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.