अबब! फळविक्रेत्यानं खरेदी केला तब्बल ६.५ लाखाच नारळ

हा फळविक्रेता विजयपुरा जिल्ह्यातील टिक्कोटा गावातील आहे.
अबब! फळविक्रेत्यानं खरेदी केला तब्बल ६.५ लाखाच नारळ
अबब! फळविक्रेत्यानं खरेदी केला तब्बल ६.५ लाखाच नारळSaam Tv
Published On

एका नारळासाठी तुम्ही किती पैसे द्याल? २५ रुपये? ३० रुपये? चला जास्तीत जास्त ४० रुपये तुम्ही द्याल. पण एका फळ विक्रेत्याने चक्क एका नारळासाठी तब्बल ६ लाख ५ हजार रुपये खर्च केले आहे. ही घटना कर्नाटमधील असून एका मंदिरातील Temple नारळाच्या लिलावादरम्यान Auction फळविक्रेत्याने हा नारळ Coconut खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. हे मंदीर बगलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील चिक्कालकी गावात असल्याची माहिती समोर आली आहे. हा फळविक्रेता विजयपुरा जिल्ह्यातील टिक्कोटा गावातील आहे.

हे देखील पहा -

श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी श्री बीलिंगेश्वल यात्रेत मंदीर समिती नारळाचा लिलाव करते. यात अनेक लोक भाग घेतात. मात्र, कोणीही फळ विक्रेत्याने लावलेल्या बोलीच्या आसपास देखील गेले नाही. भगवान मलिंगराय म्हणजे शिवाच्या नंदीचे रूप मानले जाते. त्यामुळे,या देवाजवळ ठेवलेला नारळ त्यांच्या भक्तांसाठी खूप खास असते. मंदीर समिती बऱ्याच काळापासून या नारळाचा लिलाव करते. मात्र, यासाठी कधीही १० हजाराहून अधिकची बोली लागली गेलेली नाही.

अबब! फळविक्रेत्यानं खरेदी केला तब्बल ६.५ लाखाच नारळ
महामार्गाचे काम निकृष्ट व संथगतीने; शिवसेनेचा रास्ता रोको

मात्र, यंदा ही बोली एक हजार रुपयांपासून सुरू झाली आणि पाहता पाहता हा आकडा १ लाखाच्या पार गेला. यानंतर एका भक्ताने तीन लाखांची बोली लावली. त्यानंतर मंदीर समितीच्या सदस्यांनी लगेच ही अंतिम बोली ठरवत लिलाव संपवण्याचा निर्णय घेतला, कारण याआधी कधीही नारळासाठी इतकी बोली लागली नव्हती. मात्र, अखेर फळविक्रेत्याने दुप्पट रक्कम देत हा नारळ ६.५ लाख रुपयांना खरेदी केला. या रकमेचा वापर मंदिराच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कार्यक्रमासाठी केला जाणार असल्याचे मंदीर समितीने स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com